Maharashtra Politics | ठाकरे गटाकडून भाजपवरही जोरदार आसूड ओढण्यात आले आहेत. मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली आहे. भाजप आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत. त्यामुळेच थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्त्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे.

हायलाइट्स:
- शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात
- गद्दारांना इतिहासात कधीच स्थान नसते
- पोवाडे मर्दांचे आणि स्वाभिमान्यांचे गायले जातात
‘सामना’च्या या अग्रलेखातून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचेही वाभाडे काढण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य आणि न्यायाचा विजय असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. जगात न्याय आहे असे केसरकर यांच्यासारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रीपदाचे गाजर दिसताच मिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
याशिवाय, ठाकरे गटाकडून भाजपवरही जोरदार आसूड ओढण्यात आले आहेत. मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली आहे. भाजप आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत. त्यामुळेच थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्त्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. पण शिवसेनेशी समोरासमोर लढण्याची हिंमत भाजपमध्ये नाही. त्यामुळे मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला, अशी जोरदार टीका शिंदे गट आणि भाजपवर करण्यात आली आहे.
भुजबळ-राणे-राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले पण…
‘सामना’च्या या अग्रलेखात छगन भुजबळ, नारायण राणे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे तिन्ही नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिश: आमच्यावर कठोर शब्दांत टीका केली. पण शिवसेनेचे अस्तित्त्व मिटवण्याचे अधम आणि नीच कृत्य यापैकी कोणीही केले नाही, असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.