Authored by Priyanka Vartak | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Oct 2022, 11:59 am

TCS Interim Dividend: टाटा समूहाची कंपनी टीसीएसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात अनुमानापेक्षा अधिक असून ८.४ टक्के आणि उत्पन्नात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासोबतच कंपनीने आर्थिक वर्षातील दुसरा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच टीसीएसच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती.

 

TCS announces second interim dividend
Dividend : लाभांश

हायलाइट्स:

  • देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
  • कंपनीचा नफा वार्षिक ८.४ टक्क्यांनी वाढून १०,४३१ कोटी रुपये झाला आहे.
  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर ८ रुपये अंतरिम लाभांश देईल.
मुंबई: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले असून या काळात कंपनीची कामगिरी अंदाजापेक्षा चांगली राहिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक ८.४ टक्क्यांनी वाढून १०,४३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.टाटा समूहाच्या कंपनीने सोमवारी सांगितले की, समीक्षाधीन तिमाहीत सेवांमधून मिळालेले एकूण उत्पन्न १८ टक्क्यांनी वाढून ५४,३०९ कोटी रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी २०२१-२२ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ४६,८६७ कोटी रुपये होते तर निव्वळ नफा ९,६२४ कोटी रुपये होता. मात्र, कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन १.२४ टक्क्यांनी घसरून २४ टक्क्यांवर आले आहेत.

टाटांच्या कंपनीचा मल्टीबॅगर शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई
मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर महसूल ४.८ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ९,४७८ कोटी रुपये होता, तर महसूल ५२,७५८ कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने निव्वळ ९,८४० कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले आहे. यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६.१६ लाख झाली आहे. या प्रकरणात कंपनी प्रदेशातील सर्वात मोठा नियोक्ता बनला आहे. टीसीएसचे समभाग बीएसईवर १.८४ टक्क्यांनी वाढून ३,१२१.२० रुपयांवर बंद झाले.

शेअर बाजारातून कमाई! गुंतवणूकदारांसाठी लिक्विड ETF सर्वोत्तम, अशा प्रकारे स्मार्ट गुंतवणूक करा
लाभांशाची घोषणा
मार्केट कॅपनुसार TCS ही रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ८ रुपये प्रति शेअरचा दुसरा अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे. कंपनीनुसार हा लाभांश ७ नोव्हेंबर २०२२ रोजी दिला जाईल. यासाठी १८ ऑक्टोबर २०२२ ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा लाभांश जाहीर केला आहे.

‘या’ IPO मध्ये पैसे गुंतवणूकीसाठी तुटून पडले गुंतवणूकदार; लिस्ट होण्यापूर्वीच केला धमाका
सोमवारी शेअर्स वाढीसह बंद झाले
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच टीसीएसच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. शेअर बाजारातील घसरणीनंतरही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स वधारत राहिले. दिवसाच्या व्यवहारात कंपनीचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढून ३१२९.९० रुपयांपर्यंत पोहोचले होते.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here