Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Oct 2022, 12:17 pm

Money duped scheme | गुंतवणूक केलेल्या हजारो सोलापूरकरांना यामुळे जबरदस्त धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, यात वकील,पोलीस, डॉक्टर, टेक्स्टाईल कारखानदार, सराफ व्यावसायिक, शिक्षक तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी ‘व्हर्च्यूअल मनी’मध्ये प्रचंड पैसा लावला आहे. सीसीएच, मॅक्स क्रिप्टो इतर अॅपमध्येही बहुसंख्य श्रीमंतांनी आयुष्यभराच्या कमाईची गुंतवणूक केली होती. क्रिप्टो क्लाउड हॅश या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या डॉलर्सच्या स्कीमचे आमिष दाखवण्यात आले होते.

 

cryptocurrency scam
क्रिप्टोकरन्सीच्या योजनेत पैसे बुडाले

हायलाइट्स:

  • राज्यात क्रिप्टोकरन्सीचा मोठा आर्थिक घोटाळा
  • आयुष्यभराची कमाई गमावली
  • डॉलर दामदुप्पट योजनांचे बळी
सोलापूर: गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक सोलापूरकर डॉलर दामदुप्पट योजनेत पैसे गुंतवणूक करत होता.या दामदुप्पट डॉलर योजनांना बळी पडून सोलापूरकरांना चांगलाच चुना लावण्यात आला आहे. ‘सीसीएच’ (क्लाऊड मायनर अॅप) या अमेरिकन अॅपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली आहे.पण चार दिवसांपासून सीसीएच अॅपवर डॉलर्स काढून घेण्याची सुविधा बंद झाली. तसेच मॅक्स क्रिप्टो या अॅपमधून डॉलर काढणे दहा दिवसांपासून अचानकपणे बंद झाले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक,व्यापारी,पोलीस,वकील,इंजिनिअर आदी लोकांचे जवळपास एक हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.याबाबत अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार नोंद झाली नाही.फसवणुकीत अनेक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी असूनसुद्धा ते तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत.

आयुष्यभराची कमाई गेली

गुंतवणूक केलेल्या हजारो सोलापूरकरांना यामुळे जबरदस्त धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, यात वकील,पोलीस, डॉक्टर, टेक्स्टाईल कारखानदार, सराफ व्यावसायिक, शिक्षक तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी ‘व्हर्च्यूअल मनी’मध्ये प्रचंड पैसा लावला आहे. सीसीएच, मॅक्स क्रिप्टो इतर अॅपमध्येही बहुसंख्य श्रीमंतांनी आयुष्यभराच्या कमाईची गुंतवणूक केली होती.
Ether मध्ये पैसे गुंतवले गेले आहेत, आता आयकर भरण्यास तयार रहा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
सुरुवातीला अनेकांना परतावा मिळाला

गुंतवणूकदार मागील दहा दिवसांपासून फेसबुक तसेच व्हॉट्स अॅपच्या स्टेट्सवर लाखो रुपये बुडाल्याचे दुःख अनेकजण मांडत आहेत. सोमवारी दिवसभर एकमेकांना फोनाफोनी करून कोणाची किती रक्कम बुडाली याची माहिती घेताना दिसले.या फसवणूकित कर्ज काढून रक्कम गुंतवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सुरुवातीला ज्या नागरिकांनी यामध्ये पैसा लावला त्यांनी कोट्यवधीत कमवले.वेगवेगळ्या स्कीम द्वारे दामदुप्पट डॉलर मधून कमाई केली.परतावा मिळत आहे,आणि मोठा फायदा होत असल्याने गुंतवणूक करणाऱ्या सभासदांची संख्या शंभरपटीने वाढली.
बिटकॉइनच्या किमतीत प्रचंड वाढ; मार्केट कॅप १ ट्रिलियनवर, यांना झाला फायदा
क्रिप्टो क्लाउड हॅश स्क्रीम कशाप्रकारे फसवणूक झाली?

क्रिप्टो क्लाउड हॅश या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या डॉलर्सच्या स्कीमचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला अशी झाली फसवणूक ,सीसीएच स्कीम डेली रिटर्नवर जास्त चालते. या अॅपवर अनेक योजना आहेत. सभासद होताना सुरुवातीला १०९० यूएसडीटी डॉलरची गुंतवणूक केली जाते. १०९० डॉलर म्हणजे ९२ हजार ६५० रुपयांची गुंतवणूक केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रोज सभासदांना ७ हजार ४१२ रुपये असे ३५ दिवस मिळतात. म्हणजे ३५ दिवसांत दोन लाख ५९ हजार ४१९ रुपये अॅपच्या खात्यावर डॉलर स्वरूपात जमा होतात. दुसऱ्या योजनेंतर्गत १६२४ यूएसडीटी डॉलर म्हणजे १ लाख ३८ हजार ४० रुपये गुंतविल्यानंतर १०२ दिवसांत २६ लाख ४८ हजार ८२० रुपये मिळतात. म्हणजे प्रतिदिन १५ हजार ३२२ रुपये मिळतात.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here