या प्रकरणी १८ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून मोसीन शेख (वय ३२, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील अशोका म्युज येथे १० जुलैला दुपारी घडला. करिअर मार्गदर्शन करणार्या एका कोचिंग क्लासमध्ये मोसीन शेख हा शिक्षक म्हणून काम करतो.
तक्रारदार तरुणीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली आहे. त्याचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. गेल्या वर्षी आक्टोबरमध्ये शेख याने या तरुणीच्या कॉलेजमध्ये करिअर गाइडन्सवर लेक्चर दिले होते. त्यावेळी त्याने आपला मोबाइल क्रमांक तेथील विद्यार्थ्यांना दिला होता, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. तक्रारदार तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. त्यासाठी तिने ४ जुलै रोजी शेख याला फोन केला. त्याने कौसरबागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार ही तरुणी आईला घेऊन क्लासमध्ये शेख याला भेटली. त्याने प्रवेश परिक्षेच्या फॉर्मचे बाराशे रुपये आणि क्लासचे सात हजार रुपये फी सांगितली. आठ जुलैला क्लास सुरू झाला. पण ही तरुणी पैसे भरू शकत नसल्याने क्लासला गेली नाही.
संबधित तरुणी क्लाससाठी न आल्याने शेख याने तिच्याशी संपर्क साधला. तिला भेटायला बोलावले. तुझ्या फीचे मी पाहतो, असे सांगून तिला कारमध्ये बसवून एका मित्राकडे काम असल्याचे सांगत तिला एका मित्राच्या घरी नेले. तेथे त्याने या केला. ही गोष्ट कोणाला सांगू नको, म्हणून धमकावले. दुसर्या दिवशी या तरुणीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली. या तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती शेख याला समजल्यानंतर तो फरार झाला आहे. कोंढवा पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times