नांदेडमध्ये एका अजगराने शेळीवर हल्ला करत पूर्ण शेळीच गिळंकृत केल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चोंढी या गावाच्या शिवारातील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

या परिसरात झाडाझुडूपांची संख्या मोठी असल्याने अजगरासारखे प्राणी या जंगलात वास्तव्यास आहेत. दरम्यान घंटेवाड यांनी सर्पमित्राला या घटनेची माहिती दिली. सर्पमित्र घटनेच्या ठिकाणी पोहचेपर्यंत अजगराने संपूर्ण शेळीच गिळंकृत केली होती. सर्पमित्र क्रांती बुद्धेवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या अजगराला पकडले. या बारा फुटाच्या अजगराला सुरक्षितरित्या पकडून जंगलात नेऊन सोडण्यात आले.
सर्पमित्रांनी अजगराची शेपटी धरली. अजगर शेळीला गिळून झुडूपात जात असताना सर्पमित्रांनी त्याची शेपटी धरली आणि मागे ओढली. सर्पमित्रांनी शेपटी धरताच अजगरानं गिळलेली शेळी बाहेर काढण्यास सुरुवात केली. हळूहळू अजगराच्या पोटातून संपूर्ण शेळी बाहेर आली. त्यानंतर सर्पमित्रांनी अजगराला जंगलात सोडून दिले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.