निवडणूक चिन्ह म्हणून मिळालेल्या मशालीचा फोटो ठाकरेंनी प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला आहे. त्याखाली “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” असं पक्षाला मिळालेलं अंतरिम नाव लिहिलं आहे. शिवसेनेच्या ट्विटर-फेसबुक हँडललाही हा डीपी ठेवण्यात आला आहे. हाती घेऊ “मशाल” रे! त्यासोबतच ठाकरेंच्या पाठीशी असलेल्या अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही हा डीपी ठेवला आहे.
पाहा उद्धव ठाकरेंचा डीपी :

उद्धव ठाकरेंचा डीपी
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदेंकडे चिन्हासाठी आज सकाळी दहा वाजेपर्यंत तीन पर्याय मागितले होते. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. निवडणुकीसाठी ठाकरे गटातर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं शनिवारी दिल्यामुळे दोन्ही गटांना धक्का बसला होता. दोन्ही गटांना कोणती नावं मिळतात याबद्दल उत्सुकता होती.
हेही वाचा : राष्ट्रवादीचा निशाणा, ‘बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहांच्या नावाने चिन्ह मागा’
नवीन नाव कोणतं?
निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिली आहे. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी सुचवलेल्या नावात ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिबिंब दिसून आलं होतं. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावं सुचवण्यात आली होती.
हेही वाचा : बाळासाहेबांची शिवसेना हे टायटल मिळालं इथेच आमचा विजय, अर्जुन खोतकरांकडून आनंद व्यक्त