पवन येवले, नाशिक

राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. असे असले तरी या निर्णयाविरोधात पालक-विद्यार्थ्यांकडून निषेध नोंदविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या जिल्हा परिषदेत झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. हे आंदोलन कुठल्या कामगार युनियन किंवा संघटनेचे नसून हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे होतं. हे आंदोलन विद्यार्थ्यांनी हक्काचं शिक्षण मिळावं यासाठी करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या दरेवाडी या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे.

दरेवाडीतील जिल्हा परिषदेच्या या शाळेत ४० ते ५० विद्यार्थी शिकत होते. शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात दरेवाडी गावातील विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हापरिषद समोर दप्तर घ्या, बकऱ्या द्या आंदोलन करण्यात केले. बंद झालेली शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी इगतपुरीतील दरेवाडी गावातील विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शाळा बंद केल्याने या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बकरी घेऊन विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. या विद्यार्थ्यांनी थेट नाशिक जिल्हा परिषदेसमोर ‘दप्तर घ्या बकऱ्या द्या, आंदोलन छेडलंय. आमची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाहीये. त्यामुळे आता काहीच कामाचे न राहिलेले आमचे दप्तर जिल्हा परिषदेला जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर आक्रोश मोर्चा नेत अनोखे आंदोलन छेडले.

School Closed:’शिंदे साहेबांना सांगाल का? शाळाबंदी करू नका’, विद्यार्थ्यांचा आर्त प्रश्न
भाम धरणामुळे काळुस्ते गावची दरेवाडी विस्थापित झाली आहे. इगतपुरी येथील काळूस्ते गावातील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद केल्याने येथील विद्यार्थांना इतरत्र शाळेत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इगतपुरी गट शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचे पत्र दिल्यापासुन शाळा बंदच आहेत. शाळा नसल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होवु नये म्हणुन श्रमजीवी संघटनेच्या वतीने स्थानिक गटशिक्षण अधिकारी कार्यालयात शाळा भरवुन एक अनोखे आंदोलनही करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही शाळा बंद करण्यावर प्रशासन ठाम असल्याने विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला आहे.

याबाबत माहिती मिळाल्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेकडे कूच केले. मात्र विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम असून आम्ही आता दप्तर जमा करण्यासाठी आणि बकऱ्या घेण्यासाठी नाशिकला निघालो आहोत. आम्हाला शिकायचे नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. राज्य बालहक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांचा नाशिकला दौरा असल्याने त्यांना भेटून याबाबत न्याय मागणार असल्याचेही आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांनी जिल्हापरिषद समोर केलेले हे आंदोलन चांगलं लक्षवेधी ठरले आहे. त्यामुळे आता शिक्षणापासून वंचित होत असलेल्या या विद्यार्थ्यांची हाक प्रशासन ऐकणार का ? आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघेल का हे पाहणं देखील आता तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.

School Closed: बेचाळीस शाळांवर घाला? वस्ती-पाड्यांवरचे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची चिन्हे
School Closed: कमी पटसंख्येच्या २०५ शाळांवर ‘टांगती तलवार’, ग्रामीण भागातील पालकांची चिंता वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here