पोटदुखीची समस्या तशी सामान्य आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा पोटदुखीची समस्या निर्माण होते. समस्या वाढल्यावर अनेकजण डॉक्टरांकडे जातात. बिहारमध्ये नुकताच असा एक प्रकार समोर आला.

 

bihar glass
पाटणा: पोटदुखीची समस्या तशी सामान्य आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा पोटदुखीची समस्या निर्माण होते. समस्या वाढल्यावर अनेकजण डॉक्टरांकडे जातात. बिहारमध्ये नुकताच असा एक प्रकार समोर आला. पोटदुखीची समस्या जाणवल्यानं एक तरुण डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला तपासलं. त्याच्या पोटात स्टिलचा ग्लास अडकल्याचं डॉक्टरांनी तपासणीतून समजलं.

घटना बिहारच्या बेतियाची आहे. नशेच्या धुंदीत असलेल्या २२ वर्षांच्या तरुणाला पोटदुखीची समस्या जाणवू लागली. त्याच्या गुदद्वारातून रक्तस्राव सुरू होता. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबियांनी त्याला पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली. त्या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली. तरुणाच्या पोटात १४ सेमी (५.५ इंच) लांबीचा ग्लास अडकला होता. तो शरीराच्या आत होता. त्यामुळे तरुणाच्या गुदद्वारातून रक्तस्राव सुरू होता.
चमत्कार! ४५ मिनिटं नॉनस्टॉप CPR आणि शॉक; डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णाला जीवदान
अकरा डॉक्टरांच्या पथकानं शस्त्रक्रिया करून ग्लास बाहेर काढला. डॉक्टरांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. तरुणाच्या शरीरातून ग्लास काढण्यासाठी कोलोस्टॉमी करण्यात आली. कोलोस्टॉमीमध्ये आतड्याला एक छिद्र केलं जातं आणि एक बॅग फिट केली जाते. त्यामुळे जखम बरी होते. काही दिवसांत तरुणाला डिस्चार्ज मिळेल. जानेवारीत कोलोस्टॉमी काढली जाईल. तरुण नशेच्या धुंदीत असताना शरीरात ग्लास टाकण्यात आला असावा आणि त्यामुळेच तरुणाला काही आठवत नसावं, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला.
लोखंडी अँगल ओलांडून कुटुंब निघालं, तितक्यात बाईकची धडक; वाढदिवशीच चिमुकल्याला मृत्यूनं गाठलं
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील एका व्यक्तीसोबतही असाच प्रकार घडला होता. बऱ्याच कालावधीपासून त्याच्या पोटात दुखत होतं. वेदना वाढू लागल्यानंतर त्यानं रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी रक्ताच्या चाचण्या, अल्ट्रासाऊंड आणि एक्सरे करण्यास सांगितलं. अहवाल पाहून डॉक्टरांना धक्का बसला. या व्यक्तीच्या मुत्राशयात खिळा अडकला होता. त्यामुळे त्याला अतीव वेदना सुरू होत्या. मुत्राशयात जवळपास वर्षभरापासून खिळा अडकला होता.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here