madhya pradesh news: मध्य प्रदेशच्या बेतूलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची हत्या करण्यासाठी एका पतीनं लोखंडी दरवाज्यावर इलेक्ट्रिक वायर ठेवली. मात्र प्रत्यक्षात भलतंच घडलं. या दाराला स्पर्श केल्यामुळे त्याच्या ५५ वर्षीय सासूचा मृत्यू झाला.

 

wire
बेतूल: मध्य प्रदेशच्या बेतूलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची हत्या करण्यासाठी एका पतीनं लोखंडी दरवाज्यावर इलेक्ट्रिक वायर ठेवली. मात्र प्रत्यक्षात भलतंच घडलं. या दाराला स्पर्श केल्यामुळे त्याच्या ५५ वर्षीय सासूचा मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साईखेडा गावात हा प्रकार घडला.

आरोपी पती दररोज दारू प्यायचा आणि त्यावरून त्याचा पत्नीशी वाद व्हायचा, अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अपाला सिंह यांनी दिली. रविवारी रात्री दाम्पत्यामध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. पत्नी माहेरी गेल्यानं पती संतापला. त्यानंही पत्नीचं माहेर गाठलं.
रोकड काढली अन् लगेच ATM मशीनची वायर खेचली; चोरट्यांची नवी ट्रिक; बँकेला २.७७ लाखांचा चुना
पत्नीला संपवण्यासाठी आरोपी पतीनं कट रचला. सासरवाडीतील घराच्या दरवाजा लोखंडाचा होता. पत्नीला संपवण्यासाठी त्यानं दरवाज्याला इलेक्ट्रिक तार जोडली. मात्र आरोपीच्या सासूनं दरवाज्याला संपर्क केला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here