‘मागील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली असती तर राज्यात राष्ट्रवादीच्या केवळ २० आणि काँग्रेसच्या दहा जागा निवडून आल्या असत्या, असा दावा करतनाच, ‘कुणाची किती ताकद आहे हे पाहायचं असेल तर पुन्हा एकदा सगळे स्वतंत्र लढू,’ असं खुलं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं. ( on ‘s interviews)
ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘शिवसेनेमुळंच भाजप आज महाराष्ट्रात मजबूत अवस्थेत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जे १०५ आमदार निवडून आले, त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. शिवसेनेची साथ नसती तर भाजपच्या आमदारांचा आकडा ४० ते ५० पर्यंत खाली घसरला असता,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पवार यांच्या या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी आज समाचार घेतला.
वाचा:
‘राज्याच्या निवडणुकीत कोणाच्या किती जागा निवडून आल्या ते सर्वांनी पाहिले आहे. पावसात भिजण्यापासून सगळे करून झाले. पवार साहेब तुम्ही स्वतंत्र लढला असता तर राष्ट्रवादीच्या २० आणि काँग्रेसच्या दहाच जागा आल्या असत्या. कुणाची किती ताकत आहे ते बघायचे असेल तर पुन्हा सगळे वेगवेगळे लढू. माझं खुलं आव्हान आहे. चारही पक्ष वेगवेगळे लढूया. कुणाच्या जागा जास्त येतात ते पाहू, असं पाटील म्हणाले.
वाचा:
‘शरद पवारांची मुलाखत म्हणजे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना धीर देण्याचा प्रयत्न आहे. हे सरकार बदलणार नाही, असा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरंतर, आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाही. काहीतरी गडबड होईल अशी त्यांनाच सारखी भीती वाटते’, असा टोलाही पाटील यांनी हाणला.
सरकार स्थापन करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीकडे गेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडे गेली होती या प्रश्नावर उत्तर देणं पाटील यांनी टाळलं. ‘ते खूपच सिक्रेट आहे. यावर फडणवीसच बोलतील’, एवढंच त्यांनी सांगितलं.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times