बीड : नराधम पतीनेच पत्नीसह पोटच्या ५ वर्षीय चिमुकल्याची हत्या केली आहे. ही खळबळजनक घटना बीडमधील मंजरथ गावातील काळेवस्ती येथे सोमवारी मध्यरात्री घडली. पांडुरंग दोडतले (वय ३२) असं आरोपी व्यक्तीचं नाव असून त्याने पत्नी लक्ष्मी पांडुरंग दोडतले (वय २७) आणि मुलगा पिल्या पांडुरंग दोडतले (वय ५ वर्ष) यांना निर्घृणपणे गळ्यावर आणि पोटावर वार करत संपवलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी दोडतले यांना एकूण ३ मुले आहेत. सर्वात लहान मुलगा केवळ ४ महिन्याचा आहे. लक्ष्मी यांचे आई-वडील ऊसतोडणीसाठी कारखान्याला गेले होते. त्यानमुळे त्या कालच माहेरून सासरी आल्या होत्या. मात्र मध्यरात्री पतीने राक्षसी रूप धारण केलं आणि ५ वर्षीय चिमुकल्यासह लक्ष्मी दोडतले यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

चहा-पाणी न घेता पीक जगवण्यासाठी शेतात गेला, मोटार सुरु करण्यासाठी स्टार्टरला हात लावला अन्

दरम्यान, नराधम पांडुरंग दोडतले याने आपल्या पत्नीची आणि मुलाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने मंजरथसह माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here