rickshaw overturned on potholed road: उत्तर प्रदेशातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. या रस्त्यांच्या अवस्थेबद्दल, त्यामुळे होणाऱ्या अपघातांबद्दल एक स्थानिक मीडियाशी बोलत असताना त्याचवेळी त्याच्या मागे असलेल्या एका खड्ड्यात रिक्षा उलटली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.

 

up auto
सीतापूर: उत्तर प्रदेशातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. या रस्त्यांच्या अवस्थेबद्दल, त्यामुळे होणाऱ्या अपघातांबद्दल एक स्थानिक मीडियाशी बोलत असताना त्याचवेळी त्याच्या मागे असलेल्या एका खड्ड्यात रिक्षा उलटली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. आता पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार घडला आहे. सीतापूर जिल्ह्यात खड्ड्यांमुळे एका रिक्षाला अपघात झाला.

सीतापूरच्या जहांगीराबादमधील चौकातून व्हिआयपी ताफा जात होता. ताफ्यात महागड्या कार होत्या. त्यातून बडे अधिकारी प्रवास करत होते. त्याचवेळी ताफ्यासमोर एक ई-रिक्षा आली. रिक्षाचालकानं ताफ्याला जागा देण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात खड्ड्यांमुळे ई-रिक्षा पलटली. रिक्षा पलटल्यानंतरही ताफ्यातील वाहनं पुढे जात होती. ताफ्यातील एकही कार थांबली नाही. ई-रिक्षातील प्रवाशांसाठी कोणताही अधिकारी पुढे आला नाही. अपघातग्रस्त प्रवाशांना कोणीच मदत केली नाही. आसपास असलेल्यांनी प्रवाशांसाठी धाव घेतली.

जिल्हाधिकारी अनुज सिंह यांचा ताफा सीतापूरमधून जात होता. ताफ्यात डझनभर कार होत्या. ताफा जहांगीराबाद चौकातून पुढे निघाला होता. या परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे. ताफा जात असताना त्याच रस्त्यावरून एक ई-रिक्षा जात होती. रिक्षा चालकानं वेग कमी केला. ताफ्यासाठी रस्ता मोकळा करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र या प्रयत्नात रिक्षाचं चालक खड्ड्यात अडकलं. रिक्षाचा तोल गेला आणि अपघात झाला.
पुजारी बुरखा घालून फिरत होता, लोकांनी पकडून पोलिसांकडे सोपवलं; पुजारी म्हणतो, मला तर…
अधिकाऱ्यांच्या ताफ्यासमोर अपघात झाला. रिक्षा उलटून प्रवासी रस्त्यावर पडले. मात्र ताफ्यातील कोणतीच कार थांबली नाही. आसपासच्या लोकांनी, वाटसरुंनी रिक्षातील प्रवाशांना मदतीचा हात दिला. मात्र सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी अपघाताकडे दुर्लक्ष केलं. अपघात पाहत एकापाठोपाठ एक वाहनं तिथून निघून गेली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here