बोअरवेलमधून पाण्याऐवजी दारू निघत असल्याचं तुम्ही कधी पाहिलंय? वाचून तुम्हाला हा प्रकार काहीसा विचित्र वाटेल. मात्र मध्य प्रदेशातील गुणामध्ये ही घटना घडली आहे. गुणा जिल्ह्यातील पोलीस सध्या अवैध दारूवर छापे टाकत आहेत. यादरम्यान बोअरवेलमधून दारु निघाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशात अवैध दारूविरोधात कारवाई सुरू आहे. शिवराज सिंह चौहान सरकारच्या आदेशावरून पोलीस-प्रशासनानं कारवाईला वेग दिला आहे. गुणाच नव्हे, राजधानी भोपाळसह अनेक शहरांमध्येही पोलिसांनी अभियान हाती घेतलं आहे. याआधी शनिवारी रात्री भोपाळमध्ये अवैधपणे विकल्या जाणाऱ्या हुक्का लाऊंज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली होती. ऑपरेशन प्रहारच्या अंतर्गत ही कारवाई केली गेली.
अनेक ठिकाणी अवैध पद्धतीनं दारू विकली जात असल्याची माहिती तपासातून उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी हुक्का उपकरणं जप्त केली आहेत. शनिवारी रात्री शहरात अनेक छापे टाकण्यात आले. ७७ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांवर धाडी पडल्या.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.