मुंबई: यूपीआयमुळे दैनंदिन आयुष्य सोपं झालं. अनेकांनी तर रोख पैसे सोबत ठेवणंच बंद केलं. त्यामुळे पाकिट चोरीला जाण्याचं, ते हरवण्याचं टेन्शन गेलं. कुठेही खरेदी करा आणि ऑनलाईन पेमेंट करा, यामुळे सुट्ट्या पैशांची चिंता मिटली. सुट्टे नाहीत, त्याबदल्यात चॉकलेट घ्या, असं आजकाल फार कुठे ऐकू येत नाही. सुट्टे पैसे म्हणजे एक, दोन रुपयांची चॉकलेट्स असं समीकरण झालं होतं. मात्र यूपीआयमुळे वस्तू विनिमय संपुष्टात आला. सुट्टे नाहीत, मग घ्या चॉकलेट ही स्कीम यूपीआयमुळे जवळपास संपली. त्याचा फटका बलाढ्य कंपन्यांना बसला आहे.

करोना संकट काळात यूपीआयचा वापर वाढला. स्पर्श टाळण्यासाठी अनेकजण यूपीआयचा वापर करू लागले. त्यामुळे चॉकलेट्सच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला. क्रेड आणि डंझोमध्ये ग्रोथ लीडर असलेल्या आणि ग्रोथएक्सचे संस्थापक असलेल्या अभिषेक पाटील यांनी यावर अधिक भाष्य केलं. यूपीआय आल्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न मिटला. पाटील यांनी सोशल नेटवर्किंग साईट लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे. यूपीआय आणि कँडी बिझनेसशी संबंधित काही आकडे त्यांनी पोस्टमध्ये दिले आहेत.
जबरदस्त! चर्चेत नसलेल्या शेअरची मोठी कमाल; एका ऑर्डरनं गुंतवणूकदार मालामाल; दिवसभरात २०% वाढ
२०१० मध्ये माँडलेज, नेस्ले, पारले, आयटीसी, मार्ससह अनेक मोठ्या कंपन्यांनी चक्रावून टाकणारा नफा नोंदवला. मात्र २०२० मध्ये यातील बहुतांश कंपन्यांच्या चॉकलेट्सच्या विक्रीत खूप मोठी घट झाली आहे. करोना काळात भारतात खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं, असं हर्शे कंपनीनं सांगितलं आहे. यामुळे कंपनीच्या विस्तार योजना संकटात सापडल्या आहेत.

चॉकलेट, कँडींची विक्री घटण्यास अनेक कारणं जबाबदार आहेत. यातील महत्त्वाचं कारण म्हणजे सुट्ट्या पैशांच्या बदल्यात कँडी, चॉकलेट दिल्या जाणं. सुट्टी नाहीत मग घ्या चॉकलेट ही स्कीम करोना काळात जवळपास संपुष्टात आली. यूपीआय येण्याआधी दुकानदार सुट्टे नसल्यास हातावर चॉकलेट टेकवायचे. या माध्यमातून मोठा व्यवसाय व्हायचा. चॉकलेट बाजारात त्याचा मोठा वाटा होता.
शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स ८५० तर कोसळला तर, निफ्टी १६,९८३ वर स्थिरावला
एक, दोन रुपये नसल्यास दुकानदार चॉकलेट द्यायचे. दिवसभरात या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चॉकलेट्स विकली जायची. मात्र आता सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण होत नाही. यूपीआयमुळे ग्राहक ऑनलाईन पेमेंट करतात. त्यामुळे सुट्टे नाहीत तर घ्या चॉकलेट ही स्कीम जवळपास बंद झाली आहे. या कारणामुळे चॉकलेट्सच्या विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here