परभणी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS Vidyarthi Sena)अध्यक्ष आणि राज ठाकरे (Raj Thackeray )यांच्या चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray )मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी परभणी येथील हॉटेल फर्न इथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक ऑफर दिली आहे. अमित ठाकरे यांनी तुम्ही मनसे विद्यार्थी सेनेत काम करणार का? महाविद्यालयाबाहेर विद्यार्थी सेनेची शाखा स्थापन करणार का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केला आहे. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांची संवाद साधत आहेत. त्यामुळे ते परभणी दौऱ्यावर आले आहेत. अमित ठाकरे यांच्या परभणी दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने युवक अमित ठाकरे यांच्यासोबत संवाद साधत आहेत. यावेळी अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही मनसे विद्यार्थी सेनेत काम करणार का, विद्यार्थी सेनेची शाखा प्रत्येक महाविद्यालयावर स्थापन करणार का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केला आहे.

येत्या आठवड्यात राज्यातून पाऊस माघारी?, पाहा हवामान विभागाचा अंदाज
यासोबतच अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा आपला दौरा असल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला आहे.

दिवाळी धमाका… ‘बेस्ट’ने जाहीर केली विशेष योजना, फक्त ९ रुपयांत पाच फेऱ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here