Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Oct 2022, 8:51 am

Parbhani News : एका उंदराची शिकार करताना डुरक्या गोणस जातीच्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नागरिकांनी साप शिकार करत असताना हलवण्याचा प्रयत्न केला मात्र उंदराने दम सोडल्याशिवाय सापाने उंदराला सोडलं नाही.

 

Parbhani Live News
उंदराची शिकार करताना सापाचा Video तुफान व्हायरल; नागरिकांनी सापाला चुचकारलं मात्र…

हायलाइट्स:

  • उंदराची शिकार करताना सापाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
  • शिकार करत असताना सापाला हलवण्याचा प्रयत्न केला तरीही सोडलं नाही
  • परभणीमधील गंगाखेड शहरातील नेहरु चौक येथील प्रकार
परभणी : एका उंदराची शिकार करताना डुरक्या गोणस जातीच्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नागरिकांनी साप शिकार करत असताना हलवण्याचा प्रयत्न केला मात्र उंदराने दम सोडल्याशिवाय सापाने उंदराला सोडलं नाही. हा व्हिडिओ परभणीच्या गंगाखेड शहरातील नेहरु चौक येथील आहे. व्हिडिओ पाहून नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गंगाखेड शहरातील नेहरु चौक येथील एका दुकानामध्ये साप निघाला असल्याची माहिती गंगाखेड येथील सर्पमित्र किरण भालेराव यांना देण्यात आली होती. त्यांनी तात्काळ नेहरू चौक गाठून दुकानाची पाहणी केली असता त्यांना डुरक्या गोणस जातीचा साप उंदराची शिकार करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्पमित्र किरण भालेराव यांनी सापाला व उंदराला नेहरु चौकातील रस्त्यावर आणले.

कात्रज चौकात रडत बसलेल्या तरुणीला सुखरुप घरी नेलं, मनसे नेते वसंत मोरेंनी सांगितला प्रसंग
मात्र, सर्पमित्राने सर्व उंदराला बाहेर आल्यानंतरही सापाने उंदराची शिकार त्याने सोडली नाही. या घटनेचा व्हिडिओ काही व्यक्तींनी शूट करुन आता तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडिओमध्ये सापाला हलवण्याचा देखील साप शिकारीसाठी पकडलेल्या उंदराला सोडत नसल्याचं दिसत आहे. अखेर उंदराने दम सोडल्याशिवाय सापाने उंदराला सोडले असल्याचे देखील दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सदरील सापाला सर्पमित्र किरण भालेराव यांनी पकडून सुरक्षित स्थळी नेऊन सोडून जीवनदान दिले आहे.

तेव्हा परळचं मैदान बाळासाहेबांनी मारलेलं, आता अंधेरीच्या मैदानात उद्धव ठाकरेंची कसोटी!

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here