मुंबई : दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीचे आगमन होते असे म्हटले जाते. लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठीही खास असतो. दिवाळीची संध्याकाळ जेव्हा सर्वजण सणाची तयारी करीत असतात. तेव्हाच या खास वेळी देशभरातील किरकोळ गुंतवणूकदार आणि दिग्गज बाजारात पैसे गुंतवतात. या शुभ वेळेत फायद्याची चिंता कोणी करत नाही. केवळ परंपरा पुढे नेणे ही ‘शुभ गुंतवणूक’ आहे. धनाची देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ‘ मुहूर्त ट्रेडिंग ‘ केले जाते.

सोन्यातील गुंतवणूक कुठे कराल? सणवारात बक्कळ पैसा कमावण्यासाठी कोणता फायद्याचा पर्याय
मुहूर्त ट्रेडिंग २०२२
हजारो कोटींची उलाढाल करणारा शेअर बाजार अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपत आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असली तरी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी केवळ १ तासच मार्केटमध्ये ‘मुहूर्त ट्रेडिंग’ केले जाते. या खास वेळी छोटीशी गुंतवणूक करून, बाजारातील परंपरेचे पालन करण्यासोबतच पैसे कमावण्याचीही संधी असते.

शेअर होल्डर्सची बल्ले-बल्ले; देशातील सर्वात मोठी IT कंपनी प्रति शेअर आठ रुपये लाभांश देणार
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?
दिवाळी ही नवीन वर्षाची सुरुवातही होते. यावेळी दिवाळीपासून संवत २०७९ सुरू होणार आहे. भारतीय परंपरेनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये दिवाळीपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात देखील करते. या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील व्यापारी विशेष ट्रेडिंग करतात. म्हणूनच याला ‘मुहूर्त ट्रेडिंग’ असेही म्हणतात.

Bonus Share: शेअरधारकांची लॉटरी! दिवाळीआधी ८ बोनस शेअर्स मिळणार
मुहूर्त ट्रेडिंग २०२२ ची वेळ?
बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE)मध्ये २४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading 2022) सुरू होईल. आणि ७:१५ वाजता संपेल. या दरम्यान तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकाल. सायंकाळी ६:०० ते ६:०८ पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. (Diwali 2022) यानंतर सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होईल.

मुहूर्त ट्रेडिंगला पैसे गुंतवणे शुभ मानले जाते
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात पैसे गुंतवणे शुभ मानले जाते. विशेषत: बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार या दिवशी नक्कीच गुंतवणूक करतात. अशा परिस्थितीत छोट्या गुंतवणुकदारांनीही त्याचा फायदा होतो. दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर व्यापार सुरू करून गुंतवणूकदार नवीन आर्थिक वर्षासाठी शुभेच्छा देतात. मुहूर्ताचा व्यवहार हा पूर्णपणे परंपरेशी निगडित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या दिवशी बहुतेक लोक शेअर्स खरेदी करतात. मात्र, ही गुंतवणूक अत्यंत छोटी आणि प्रतीकात्मक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here