पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना नक्की कोणाची यावरुन वाद सुरु आहेत. या वादात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार चिन्ह दिले. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही गट हे चिन्ह वापरू शकतात. दोन्ही गट आपापले चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील मंचर इथून एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाने आपले मशाल चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कंबर कसली असून संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी मशाल यात्रा निघत आहेत. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल दुपारी मशाल क्रांतीज्योतीच स्वागत करण्यात आलं. मात्र, या यात्रेत उद्धव ठाकरे गटातील दोन नेत्यांची फ्री-स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.

Pune Bus Fire : २९ प्रवाशांसह भीमाशंकरला निघालेली खासगी बस पेटली, पुण्यात अग्नितांडव
ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी किल्ले शिवनेरी ते मातोश्री मशाल क्रांतीज्योतीचा आयोजन करण्यात आलं होतं. मंचर येथे मशाल ज्योतीच आगमन झालं यावेळी ज्योत हातात घेण्यासाठी मंचरचे माजी सरपंच दत्ता गंजाळे उपस्थित झाले. मात्र, यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा संघटक तथा माजी पंचायत समिती सदस्य राजा बाणखेले यांनी गंजाळे यांना रोखले आणि यावरुनच दोन नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं.

गंजाळे मशाल घेण्यासाठी आले त्यावेळी बाणखेले म्हणाले की, शिंदे गट आणि भाजपच्या व्यासपीठावर असणाऱ्यांचं इथं काय काम? येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेल्यांनाच मशालीचे स्वागत करण्याचा अधिकार आहे. यावर गंजाळ यांनी मात्र आपण कधीही शिंदे गटात आणि भाजपच्या व्यासपीठात गेलोच नाही, असा दावा केला आणि या दोन नेत्यांमध्ये फ्री-स्टाइल हाणामारी पाहायला मिळाली. मात्र, वेळीच तालुका प्रमुख दिलीप पवळे आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी दोघांना रोखले आणि हा वाद मिटवला.

ढाल आणि तलवार चिन्ह मिळाल्यानंतर आनंदाश्रमात शिंदे गटाचा मोठा जल्लोष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here