मुंबई : टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअर्सने गेल्या तीन महिन्यांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. ही कंपनी टाटा केमिकल्स लिमिटेड आहे. टाटा केमिकल्सचे शेअर्स गेल्या ३ महिन्यांत ८०० रुपयांवरून १२०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी ४० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मंगळवारी ११ ऑक्टोबर २०२२ रोजी टाटा केमिकल्सच्या समभागांनी नवीन उच्चांक गाठला. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवसभराच्या व्यवहारादरम्यान कंपनीच्या समभागांनी १२१४.६५ रुपयांची पातळी गाठली.

शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग; जाणून घ्या ह्याचे महत्त्व, यंदाची मुहूर्ताची वेळ
कंपनीचे शेअर्स १२०० रुपयांच्या पुढे
कमोडिटी केमिकल स्पेसचा भाग असलेल्या टाटा केमिकल्सने जुलैपासून ४० टक्क्यांहून अधिक वाढ करून ऑक्टोबरमध्ये नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे आणि त्याची गती कायम राहण्याची शक्यता आहे. टाटा केमिकल्स लिमिटेडचे शेअर्स ५ जुलै २०२२ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर ८०३.४० रुपये होते. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२२ रोजी म्हणजेच तीन महिन्यात कंपनीचे शेअर्स बीएसईवर १२०५.६० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.

जबरदस्त! चर्चेत नसलेल्या शेअरची मोठी कमाल; एका ऑर्डरनं गुंतवणूकदार मालामाल; दिवसभरात २०% वाढ
या कालावधीत कंपनीच्या समभागांनी ४५ टक्केपेक्षा जास्त परतावा दिला आहे. टाटा केमिकल्सच्या समभागांनी गेल्या पाच दिवसात गुंतवणूकदारांना सुमारे ८% परतावा दिला आहे. टाटा केमिकल्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक ७७३.३५ रुपये आहे. “आम्ही रु. १,४०० च्या लक्ष्यासाठी टाटा केमिकलला रु. १,१२० च्या स्टॉप लॉससह खरेदी (Buy) करण्याचा सल्ला देत आहोत. या लक्ष्याचा कालावधी २ ते ३ महिन्यांचा आहे,” अशी शिफारस स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी केली.

इन्फोसिस शेअर बायबॅकच्या विचारात; गुंतवणूकदारांनी काय करावे, एका क्लिकवर समजून घ्या
शेअर्सने ३० महिन्यांत २२० ते १२०० रुपयांचा टप्पा ओलांडला
टाटा केमिकल्सच्या शेअर्सने गेल्या ३० महिन्यांत जबरदस्त परतावा दिला आहे. ३ एप्रिल २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर टाटा केमिकल्सचे शेअर्स २१८.५५ रुपयांच्या पातळीवर होते. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर १२०५.६० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. टाटा केमिकल्सच्या शेअर्सने गेल्या पाच वर्षांत सुमारे २९५ टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी, या वर्षी आतापर्यंत केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे ३२ टक्के तर टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात २४% परतावा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here