Authored by विकास दळवी | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Oct 2022, 12:15 pm

Hingoli News : पुरणपोळ्या आमच्या घरी खायला या अशा आशयाचे भावनिक पत्र मुख्यमंत्र्याच्या नावाने लिहणाऱ्या प्रतापची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला या चिमुकल्याच्या घरी भेट देण्यासाठी पाठवले.

 

Farmers Children Eknath Shinde
दिवाळीला पुरणपोळी द्या, शिंदेंना भावनिक साद घालणाऱ्या चिमुकल्याला गोड बातमी, हक्काचं घर मिळणार

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांना लिहिलं भावनिक पत्र
  • मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्राची दखल
  • २४ तासात घरकुल देण्याचे आश्वासन
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्रताप जगन कावरखे या इयत्ता सहावीमधील मुलाने अनुदानाची रक्कम लवकर मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी पत्र लिहिले. यात त्याने “सायेब, पैसे लवकर द्या, मग आई पुरणपोळ्या करंल, तुम्ही बी खायला या…” अशी आर्त हाक दिली होती. याची दखल घेत थेट मुख्यमंत्री कार्यालयातून हिंगोली जिल्हा परिषदेत फोन खणखणला. अधिकाऱ्यांनी प्रतापच्या घरी गोरेगावला भेट दिली व समाजकल्याण विभागाकडून प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी व कावरखे कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतापचे डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न

मुख्यमंत्री कार्यालयाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, जि.प.चे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे,समाजकल्याण अधिकारी राजेश एडके यांच्या पथकाने गावात पाहणी केली व घरकुल मंजूर करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची गोरेगावला भेट देत जि.प.च्या पथकाने प्रतापशी संवाद साधला यात तो हुशार असल्याचे अधिकाऱ्यांना जाणवले. खूप शिकून डॉक्टर होत रुग्णांची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. प्रतापला वसतिगृहात ठेवायची तयारी असेल तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी समाजकल्याण विभागाने दाखवली.

Gold-Silver Price Today: दिवाळीच्या तोंडावर स्वस्त झालं सोनं, चांदीच्या दरातही मोठी घसरण

Emotional Letter To CM

उद्योगासाठी कृषी विभागाची मदत

प्रतापच्या वडिलांच्या नावे फक्त २५ गुंठे जमीन आहे. बचत गटाद्वारे त्यांना वैयक्तिक स्वरुपात कर्ज देऊन लघुउद्योग सुरु करण्यासाठी कृषी विभागातर्फे मदत करण्याचे आश्वासन कृषी अधिकारी कानवडे यांनी दिले. त्यामुळे प्रतापला पुढील काही दिवसातच हक्काचे घरकुल मिळणार आहे. यासोबतच अनेकांनी देखील मदतीचे आश्वासन दिले.

तुमच्यापेक्षा माझ्यात हिंमत जास्त; ठाकरे गटातील संतप्त कार्यकर्त्यांचा थेट आमदार भरत गोगावलेंना कॉल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here