सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या एका कलाकारावर काळाने घाला घातला आहे. आपली कला सादर करत असताना या कलाकाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेश येथे घडली आहे. छब्बन पांडे असं या कलाकाराचं नाव असून ते ५५ वर्षांचे होते. सुरु रामलीलेमध्ये पांडे अचानक मंचावर कोसळले. रामलीला सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेश येथील जौनपूर येथे पांडे आपली कला सादर करत होते. पांडे गेली सहा वर्ष रामलीलेमध्ये शंकराची भूमिका साकारत होते. या वेळेसही ते शंकराच्या भूमिकेत होते. आणि त्या वेषातच ते मंचावर कोसळले. त्यांच्या मृत्यूदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात पांडे शंकराच्या अवतारात दिसत आहेत तर एक व्यक्ती त्यांची पूजा करतेय. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी दररोज शंकराची आरती करण्यात येते. मात्र काही सेकंदानंतर पांडे मंचावर कोसळताना दिसतायत. त्यानंतर तिथे उपस्थित असणारे त्यांच्याकडे धाव घेताना दिसतायत. ही संपूर्ण घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. पांडे मंचावर कोसळताच त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पांडे कोसळल्यानंतर रामलीला स्थगित करण्यात आली.

रामलीलामधील इतर व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे यांना खूप घाम येत होता. ते पूर्वीपासूनच अस्वस्थ होते. त्यांच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. शंकराची भूमिका साकारणाऱ्या पांडे यांच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here