anil parab, Andheri bypolls: ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रिपदाची ऑफर; अनिल परबांचा गौप्यस्फोट – shiv sena thackeray faction anil parab press conference bmc commissioner not sanction resignation of rutuja ramesh latke due to shinde camp pressure
Maharashtra Politics | शिवसेनेचे पदाधिकारी ऋजुता लटके यांचा राजीनामा मंजूर व्हावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न करत आहेत. सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात शिवसेनेचे काही पदाधिकारी ठाण मांडून बसले होते. महानगरपालिकेच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला स्वेच्छानिवृत्ती हवी असेल तर तीन महिने आधी नोटीस द्यावी लागते आणि राजीनामा द्यायचा असेल तर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते.
अनिल परब आणि ऋतुजा लटके
हायलाइट्स:
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्याने शिवसेना आक्रमक
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरता येऊ नये, यासाठी शिंदे गटाकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत लिपीक आहेत. मात्र, त्यांच्या नोकरीचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेकडून जाणीवपूर्वक मंजूर केला जात नाही. त्यासाठी पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर शिंदे गटाकडून दबाव आणला जात आहे. शिंदे गट ऋतुजा लटके यांच्यावरही दबाव आणत आहे. तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा, तुमचा नोकरीचा राजीनामा लगेच मंजूर होईल, असे शिंदे गटाकडून लटके यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटात प्रवेश केल्यास ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाची ऑफरही असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अनिल परब यांनी शिंदे गटावर अनेक गंभीर आरोप केले.