andheri east assembly by poll: ऋतुजा लटकेंनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप तरी तो स्वीकारण्यात आलेला नाही. महापालिकेनं राजीनामा न स्वीकारल्यानं ठाकरे गट आणि महाविकास आघाडी सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

अंधेरीत अकोल्याची पुनरावृत्ती होणार?
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेससमोरही असाच पेच निर्माण झाला होता. अकोला लोकसभा मतदारसंघात डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. भाजपचे विद्यमान खासदार आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या विरोधात काँग्रेसनं पाटील यांना उतरवण्याची तयारी सुरू केली होती.
संजय धोत्रे यांना अभय पाटील चांगली टक्कर देऊ शकतात, अशी माहिती काँग्रेसनं तटस्थ यंत्रणांमार्फत केलेल्या अनेक सर्वेक्षणांमधून समोर आली. त्यामुळे काँग्रेसनं पाटील यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली. मात्र पाटील शासकीय सेवेत होते. त्यांनी राजीनामाही दिला. मात्र तेव्हाच्या सरकारनं अखेरपर्यंत पाटील यांचा राजीनामा मंजूर केला नाही. त्यामुळे अखेर काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. काँग्रेसकडून पाटील यांच्याऐवजी हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. पटेल तब्बल ३ लाख मतांनी पराभूत झाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.