मुंबई : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भारतीय शेअर बाजार (NSE आणि BSE) २४ ऑक्टोबर २०२२ रोजी तासभरासाठी उघडतील. बीएसई आणि एनएसईवर उपलब्ध सूचनेनुसार इक्विटी, इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग संध्याकाळी ६:१५ वाजता सुरू होईल आणि एक तासानंतर ७:१५ वाजता बंद होईल. तर प्री-ओपन सत्र संध्याकाळी ६:०० वाजता सुरू होईल आणि ६:०८ वाजता संपेल. दिवाळी ही नवीन वर्षाची सुरुवातही होते. यावेळी दिवाळीपासून संवत २०७९ सुरू होणार आहे.

शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग; जाणून घ्या ह्याचे महत्त्व, यंदाची मुहूर्ताची वेळ
दिवाळीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, त्यामुळे शेअर बाजारासाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी बाजार बंद असतो पण एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन केले जाते. दिवाळीच्या काळात शेअर बाजार एका तासासाठी खुला असेल, यादरम्यान तुम्ही गुंतवणूक करू शकता. हा ट्रेंड विशेषतः गुजराती आणि मारवाड्यांमध्ये लोकप्रिय आहे. मुहूर्ताच्या व्यवहारापूर्वी दलाल स्टॉक एक्स्चेंजमधील खात्यांची पूजा करतात. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी व्यापाऱ्यांची श्रद्धा आहे. आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज बीएसई गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ‘मुहूर्त ट्रेडिंग’ करत आहेत.

३ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे डबल; टाटांच्या शेअरचा नवीन उच्चांक, मार्केट एक्स्पर्ट म्हणतात…
मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान करावे आणि काय करू नये

लहान खरेदी करा
मुहूर्ताच्या व्यापाराच्या वेळी छोटीशी गुंतवणूक करून चांगली गुंतवणूक करा. तसेच गुंतवणूक करताना लक्षात ठेवा की कोणते शेअर्स तुम्हाला दीर्घकाळात चांगले परतावा देऊ शकतात.

दर्जेदार स्टॉकमध्ये गुंतवणूक करा
दरम्यान केवळ दर्जेदार शेअर्समध्येच गुंतवणूक करा. असे शेअर्स ज्यांची कामगिरी आधीच चांगली आहे आणि कंपनीही चांगली कामगिरी करत आहे.

शेअर बाजारातून कमाई! गुंतवणूकदारांसाठी लिक्विड ETF सर्वोत्तम, अशा प्रकारे स्मार्ट गुंतवणूक करा
मोठी गुंतवणूक टाळा
मुहूर्त ट्रेडिंगची वेळ खूपच कमी आहे, त्यामुळे या काळात मोठी गुंतवणूक करणे टाळा. हे सामान्य सत्र नसल्यामुळे अनेक वेळा लोक चुका करतात.

मुहूर्ताच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या एक तासाच्या मुहूर्तावर बहुतांश गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतात. मुहूर्ताची खरेदी-विक्रीची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. दरवर्षी मुहूर्ताच्या व्यवहारासाठी एक विशिष्ट वेळ निश्चित केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here