वाचा:
मनसेने उपमुख्यमंत्री यांना लक्ष्य केले. पालकमंत्री पवार यांनी पुण्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे सरकार नेमकं कोण चालवत आहे हेच कळायला मार्ग नाही. सरकार पुरतं गोंधळलेलं आहे, असा टोला मनसेने लगावला.
राज्य सरकारमध्ये सध्या कुरघोडीचं राजकारण चालू आहे. नगरसेवकांची देवाणघेवाण झाली आणि वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मानापमान नाट्यही पाहायला मिळालं. या साऱ्यात व्यस्त असताना स्थितीकडे मात्र सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे आणि त्यातूनच प्रमुख शहरांत करोनाचा प्रादुर्भाव वाढून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे, असे पुणे शहर अजय शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे. पुण्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे नागरिक हवालदील झाले आहेत. व्यावसायिक, कामगार यांच्यापुढे आर्थिक संकट उभं ठाकलं आहे, असे नमूद करताना लॉकडाऊन हटवून सगळं मैदान खुलं का करण्यात आलं होतं, असा सवालही शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, पुणे पालिकेत भाजपची सत्ता असून भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या लॉकडाऊनला आधीच तीव्र विरोध केला आहे. पुणे शहरात फक्त ३ टक्के प्रतिबंधित क्षेत्र असून त्यासाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरले जात आहे, असा सवाल बापट यांनी केला होता. पुण्यातील व्यापाऱ्यांनीही लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केलेला आहे.
वाचा:
१० दिवस कडक लॉकडाऊन
पुण्यात आज मध्यरात्रीपासून दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पहिले पाच दिवस (१८ जुलैपर्यंत) शहरातील किराणा माल व भाजीपाल्याच्या दुकानांसह सर्व दुकाने, खासगी कार्यालये, हॉटेल, मंडई, फळबाजार यांसह सर्व ऑनलाइन सेवा बंद राहणार आहेत. त्यानंतर १९ ते २३ जुलै या काळात किराणा दुकाने, भाजी/फळबाजार यांसह अत्यावश्यक सेवांसाठी दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दहा दिवसांच्या या कडक लॉकडाउनच्या कालावधीत दूधपुरवठा, औषधांची दुकाने, अत्यावश्यक सेवा आणि वृत्तपत्रांचे वितरण मात्र सुरू राहणार आहे. १९ जुलैनंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले जाणार असून, भाजी-किराणा, चिकन-मटण यांची दुकाने मर्यादित कालावधीसाठी खुली ठेवली जाणार आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times