१८ नोव्हेंबर २०२१ रोजी गंगाधर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यासोबत ग्रामस्थ देवा मुर्मू, छिता हांसदा, भानू सिंह, मांझोल सिंह आणि टेटे गिरी यांच्यासह आणखी दोघांची शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना शस्त्रक्रियेनंतर घरी पाठवण्यात आलं. काही दिवसांनंतर गंगाधर यांच्या डोळ्याला खाज सुटू लागली. गंगाधर उपचारांसाठी जमशेदरपूर, रांची आणि कोलकात्याला गेले. मात्र समस्या कायम राहिली.
दिवसागणिक समस्या वाढू लागली. खाज आणि जळजळ इतकी वाढली की त्यांनी दोन्ही हातांनी डोळे चोळण्यास सुरुवात केली. त्यांनी डोळ्यात पाणी टाकलं. यानंतर डोळ्याच्या भागात लावण्यात आलेली काचेची गोटी बाहेर आली. त्यामुळे गंगाधर घाबरले. काचेची गोटी घेऊन ते रुग्णालयात पोहोचले. गंगाधर यांचा खरा डोळा काढून त्याच्या जागी खोटा डोळा लावला गेल्याचं तपासातून बाहेर आलं. त्यामुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली. यानंतर ग्रामस्थांनी एक बैठक घेतली. ज्या महिलेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली, तिचा शोध सध्या सुरू आहे.
Home Maharashtra eye operation, हात लावताच डोळा निघाला! वृद्धासोबत घडला धक्कादायक प्रकार; रुग्णालयात एकच...
eye operation, हात लावताच डोळा निघाला! वृद्धासोबत घडला धक्कादायक प्रकार; रुग्णालयात एकच खळबळ – eye missing removal after operation surgery shocking incident kcc hospital civil surgeon jamshedpur
जमशेदपूर: झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान आपला खरा डोळा काढून त्याच्या जागी खेळण्यातील डोळा लावण्यात आल्याचा आरोप एका वृद्धानं केला आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित गंगाधर सिंह यांनी केसीसी रुग्णालय प्रशासन आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.