Gym fight video: अनेक जण दररोज जिमला जातात. शरीर तंदुरुस्त राहावं यासाठी न चुकता व्यायाम करतात. मात्र जिममध्ये अनेकदा वादही होतात. प्रकरण हाणामारीपर्यंत जातात. जिममधील अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

gym fight
अनेक जण दररोज जिमला जातात. शरीर तंदुरुस्त राहावं यासाठी न चुकता व्यायाम करतात. मात्र जिममध्ये अनेकदा वादही होतात. प्रकरण हाणामारीपर्यंत जातात. जिममधील अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिममध्ये व्यायाम करतेवेळी झालेलं भांडण सीसीटीव्हीत कैद झालं. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

जिममध्ये व्यायाम करणाऱ्या दोन महिलांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. सीसीटीव्हीत दिसत असलेल्या दृश्यांनुसार एक महिला व्यायाम करत होती. त्याचवेळी त्याच मशीनवर व्यायाम करण्यासाठी दुसरी महिला पोहोचली. पहिल्या महिलेचा व्यायाम संपण्याची वाट पाहू लागली.

थोड्याच वेळात पहिल्या महिलेचा व्यायाम संपला. त्यामुळे दुसरी महिला व्यायाम करण्यासाठी सरसावली. त्यावेळी तिसऱ्याच महिलेनं मशीनचा ताबा घेतला. पुढचा सेट कोण मारणार यावरून दोघींमध्ये वाद झाला. अवघ्या काही सेकंदांत प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. एकीनं दुसरीच्या कानशिलात दिली. दोघींनी एकमेकींचे केस खेचले. धक्काबुक्की झाली. यानंतर जीममधील काही महिला भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्या. त्यांनी वाद घालणाऱ्या दोघींना दूर केलं आणि वाद मिटवला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here