Uttar Pradesh Snake bite: उत्तर प्रदेशच्या ओरैयामध्ये एका महिलेला सर्पदंश झाला. तिला घेऊन तिचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. महिलेला कोणता साप चावला आहे, याबद्दल नातेवाईकांनी विचारणा केली. डॉक्टरांनी प्रश्न विचारताच महिलेच्या नातेवाईकांनी गोणी उघडली आणि डॉक्टरांना साप दाखवला.

 

snake 1
ओरैया: उत्तर प्रदेशच्या ओरैयामध्ये एका महिलेला सर्पदंश झाला. तिला घेऊन तिचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. महिलेला कोणता साप चावला आहे, याबद्दल नातेवाईकांनी विचारणा केली. डॉक्टरांनी प्रश्न विचारताच महिलेच्या नातेवाईकांनी गोणी उघडली आणि डॉक्टरांना साप दाखवला. हा प्रकार पाहून डॉक्टर चक्रावून गेले. त्यांनी नातेवाईकांना सापाला सोडून देण्यास सांगितलं आणि महिलेवर उपचार सुरू केले. दरम्यान सापाला पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी झाली.

घटना ओरैयामधील दिबियापूरची आहे. काल रात्री उशिरा राणा नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पिंकी देवी यांना त्यांच्या घराबाहेर साप चावला. कुटुंबियांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात नेलं. महिलेला कोणता साप चावला, अशी विचारणा डॉक्टरांनी केली. त्यावेळी नातेवाईकांनी सोबत आणलेली गोणी उघडली. त्यामध्ये एक साप होता. नातेवाईकांनी डॉक्टरांना साप दाखवला. हाच साप चावला होता, असं उत्तर नातेवाईकांनी दिलं.
हात लावताच डोळा निघाला! वृद्धासोबत घडला धक्कादायक प्रकार; रुग्णालयात एकच खळबळ
गोणीत साप असल्याचं पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. रुग्णालयातील अनेकांनी साप पाहायला गर्दी केली. डॉक्टरांनी नातेवाईकांना साप बाहेर सोडून येण्यास सांगितलं. महिलेवर उपचार सुरू करण्यात आले. आता तिची प्रकृती चांगली आहे. मात्र अजूनही त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तिला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
हाण की बडीव! कानफाटात दिल्या, झिंज्या उपटल्या; जिममध्ये दोन महिला भिडल्या; पाहा VIDEO
याआधी १७ सप्टेंबरला सोनभद्रमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना रात्री साप चावला. त्यावेळी तिघेजण झोपले होते. सर्पदंशामुळे आई आणि लेकीचा मृत्यू झाला. तर मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी सापाला काठीनं मारहाण केली. यात सापाचा मृत्यू झाला. चोपन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गौरव नगरमध्ये हा प्रकार घडला होता.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here