दुचाकीचं इंजिन गरम असल्यानं आग लागली. आग पाहून आसपासचे लोक घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले. दुचाकीवरील मुलगा आणि त्याच्या आजोबांच्या कपड्यांना आग लागली. पेट्रोल पंपवरील कर्मचारी आणि लोकांनी मिळून दुचाकी दूर नेली. या अपघातात कर्मचाऱ्यांचे हात भाजले.
दुचाकीवरील तिघे जण ताजी बाग गावाचे रहिवासी आहेत. वडील आणि मुलासह मंगळवारी बाहेर गेलो असतानाहा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. हनुमान चौकातील पेट्रोल पंपवर टाकी फुल केली. त्यानंतर पेट्रोलचे एक-दोन थेंब दुचाकीच्या इंजिनावर पडले. इंजिन गरम असल्यानं आग लागली. आम्ही घाबरून दुचाकीवरून खाली पडलो. मुलगा आणि वडिलांच्या कपड्यांना आग लागली. त्यांना कसंबसं वाचवण्यात आल्याचं ते म्हणाले.
हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपवरील दुचाकीला अचानक आग लागली. पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून अग्निरोधक यंत्रणेचा वापर करत आग विझवली. टाकीत पेट्रोल जास्त असल्यानं आग विझवण्यास वेळ लागला. पंपवर असलेल्या लोकांमुळे मोठा अनर्थ टळला.