बीड : बीडजवळील बायपास रोडवर दुपारच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती जागीच ठार झाल्या आहेत. अनिता भारत सर्प (राहणार-गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) आणि विठ्ठल कालिदास जाधव (राहणार-शेलगाव गांजी, तालुका केज) अशी अपघातातील मृतांची नावे असून दोघेही मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारीच्या वेळी बीडपासून बार्शी नाका परिसराजवळ असलेल्या बायपास रोडवर दुचाकीवरून जाणारे एक महिला आणि एक पुरुष हे बायपास रोड ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. टेम्पोची धडक इतकी जोरदार होती की दुचाकी फरफटत दुभाजकावर गेली आणि दुचाकीवर असणारे दोघेही गंभीर जखमी झाले.

अहमदनगर शहरात काँग्रेसचा अवघा एक मतदार; शहराध्यक्षालाही अधिकार नाही

अपघात झाल्याचं कळताच आजूबाजूच्या लोकांनी आणि यंत्रणेने दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं.

दपम्यान, अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक फरार झाला असून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेनं बीड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here