वाचा:
पालिकेचे नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना दटके यांनी शिवीगाळ केली. हे समजताच महापालिकेतील सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेर पडून विरोध करू लागले. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देत लेखणीबंद आंदोलन करण्याचे जाहीर केले. आयुक्तांनी अत्यावश्यक सेवा व तातडीच्या कामांना यातून वगळण्याची सूचना केली. तसेच याबाबत राज्य सरकारला कळविण्याचे आश्वासन दिले.
वाचा:
आयुक्तांच्या या भूमिकेनंतरही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या मतावर ठाम राहत संबंधित आमदाराने माफी मागावी असा आग्रह धरला. लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून शहराची कामे होत असतात. असा प्रकार भविष्यात घडू नये यासाठी हे आंदोलन असल्याचे कर्मचारी नेत्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांना निवेदन देते वेळी मनपाचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी नेते उपस्थित होते. या आंदोलनामुळे महापालिकेच्या दिवसभराच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक महापालिका कार्यालयात येऊन परत जात असल्याचे चित्र आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times