जळगाव : शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या नवीपेठ येथील महावीर बँकेच्या पाठीमागे एका कंपनीच्या नावे असणाऱ्या ऑफिसमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सेक्स रॅकेटवर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज दुपारी ४ वाजता छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कारवाई करत २ पुरुष ग्राहक आणि ६ तरुणींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात अवैध सेक्स रॅकेट्स अनेक ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असून पोलीस अधिकारी व कर्मचारी हे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच दोन हॉटेलवर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी मोठी कारवाई करत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

उपचारावेळी आठ महिन्यांचं बाळ दगावलं, नाशिकमध्ये नातेवाईक आक्रमक; रुग्णालय बंद करण्याची मागणी

शहरातील नवीपेठ परिसरातील महावीर बँकेच्या पाठीमागे असलेल्या एका कार्यालयाच्या खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची गोपनीय माहिती आज शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह पथकाने छापा टाकला.

दरम्यान, एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत वेश्यव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणींना ताब्यात घेतलं आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here