बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची बाधा झाल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्यासाठी भारतीय चाहते प्रार्थना करत असल्याचेही पाहाया मिळाले आहे. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही अमिताभ यांच्यासाठी एक ट्विट केल्याचे पाहायला मिळत आहे.

शनिवारी संध्याकाळी हलकासा ताप आल्यामुळे अमिताभ बच्चन चेकअप करण्यासाठी नानावटी इस्पितळात गेले होते. तिथे करोनाची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. अमिताभ यांच्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांच्याही टेस्ट झाल्या. यात फक्त जया यांची टेस्ट निगेटिव्ह आली. बाकी चारजणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोलकत्तामध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी पूजा आणि यज्ञ केला जात आहे. कोलकत्तातील श्यामबाजार येथे राहणाऱ्या लोकांनी बिग बींसाठी शिव मंदिरात यज्ञ केला. याशिवाय ऑल सेलिब्रिटी फ्रेण्ड्स क्लबच्या सदस्यांनी बेहाला येथील परिसरात पूजेचं आयोजन केलं होतं.

आफ्रिदीलाही करोना झालेला होता. त्यामुळे करोना झाल्यावर नेमके काय होते, हे त्याचा जास्त माहिती असावे. त्यामुळे आफ्रिदीने अमिताभ यांच्यासाठी एक ट्विट केले आहे. आफ्रिदीने या ट्विटमध्ये, अमिताभ आणि अभिषेक माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेतच. मला अशी आशा आहे की, तुमच्या तब्येतीमध्ये लवकरच सुधारणा होईल.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनसह आता ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चन पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. दरम्यान अभिषेक आणि अमिताभ यांना नानावटीमध्ये भरती करण्यात आलं आहे. यात अमिताभ यांच्या घराजवळील संरक्षणही वाढवण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ यांच्या जुहू येथील दोन्ही बंगल्याच्या बाहेर अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. बिग बी करोना पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यानंतर अनेक चाहते इस्पितळाच्या बाहेर जमा होऊ लागले आहेत. मात्र त्यांना तिथून हटवण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here