वॉशिंग्टन : ‘आर्थिक विकासाच्या बाबतीत जगभरात मंदीसदृश वातावरण असताना, भारतीय अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसत असताना, भारताची अर्थव्यवस्था तुलनेने चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे,’ या शब्दांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचे मंगळवारी कौतूक केले.

आर्थिक संकटाचा ‘फेरा’! जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जेपी मॉर्गन CEOचा इशारा, पाहा काय म्हणाले
या संदर्भात वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नाणेनिधीचे आशिया-प्रशांत प्रदेशाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन जागतिक वातावरण आक्रसले आहे याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘जगाच्या अनेक भागांत आर्थिक विकासाची गती खुंटलेली आहे, त्याचप्रमाणे चलनवाढही वेगाने होऊ लागली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत एक तृतीयांश हिस्सा असलेल्या देशांमध्ये या किंवा पुढील वर्षी मंदी येणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर महागाईचा सामनाही या देशांना करावा लागणार आहे. जवळपास प्रत्येक देश मंदीच्या फेऱ्यात अडकू लागला आहे. त्याच वेळी भारतीय अर्थव्यवस्था मात्र आपले प्रभावी रूप जगाला दाखवत आहे.’

रशिया यूक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम, जागतिक बँकेकडून विकास दराबाबत मोठं भाकित
नाणेनिधीचा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल
– यंदा भारताचा विकासदर ६.८ टक्के राहील.

– २०२१मध्ये विकासदर ८.७ टक्के होता.

– २०२३मध्ये विकासदर ६.१ टक्के होईल .

आर्थिक दाणादाण उडण्याची कारणे

– जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपापल्या पतधोरणांमध्ये कडक भूमिका स्वीकारली आहे. महागाईशी मुकाबला करण्यासाठी आशियाई अर्थव्यवस्थांनी कडक आर्थिक उपाय योजण्यास सुरुवात केली आहे.

– रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्य आणि वस्तू यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक देशांच्या चालू खात्यातील तूटही विस्तारली आहे.

– आशिया-प्रशांत प्रदेशात चीनची अर्थव्यवस्थाही मंद गतीने वाटचाल करत आहे.

भारताशी पंगा महागात पडणार; चीन लवकरच एकाकी पडणार, वाचा काय होणार आहे
भारतातील स्थिती

– देशाबाहेरून येणारी मागणी कमी झाल्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे.

– देशात सातत्याने चलनवाढ होत आहे.

– रिझर्व्ह बँकेने चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी पतधोरणात कडक उपाययोजना केल्या आहेत.

– देशातील मागणी मंदावण्याचा धोका समोर येऊ लागला आहे.

– देशात महागाई वाढत असल्याने ती कमी करण्यासाठी पतधोरणात कडक उपाय योजले की त्याचा परिणाम म्हणून देशात गुंतवणूक कमी होण्याची भीती आहे.

– या सर्वांचा परिपाक म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची भीती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here