Maharashtra Politics | ऋतुजा लटके यांना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवले जात आहे. अनिल परब यांचा हा डाव लटके वहिनींनी ओळखावा, असा सल्ला मनोज चव्हाण यांनी देऊ केला आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता साधारण ३२ तास शिल्लक राहिले आहेत.

हायलाइट्स:
- मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही
- उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता साधारण ३२ तास शिल्लक राहिले आहेत
ऋतुजा लटके यांना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवले जात आहे. अंधेरी पोटनिवडणुकीची उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा डाव अनिल परब यांनी आखला आहे. अनिल परब यांचा हा डाव लटके वहिनींनी ओळखावा, असा सल्ला मनोज चव्हाण यांनी देऊ केला आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता साधारण ३२ तास शिल्लक राहिले आहेत. परंतु, मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरता येणे शक्य नाही. अगदी शेवटच्या क्षणी पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला तरी त्यानंतर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या मनोज चव्हाण यांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे ऋतुजा लटके यांनी बुधवारी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नवख्या असलेल्या ऋतुजा लटके यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या शेजारी माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर बसले होते. या पत्रकारपरिषदेत बहुतांश प्रश्नांची उत्तरे महाडेश्वर यांनीच दिली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ऋजुता लटके यांना एक प्रश्न विचारला. तुम्हाला शिंदे गटाने मंत्रिपदासाठी विचारलं आहे, असा आरोप होत आहे. तुम्ही शिंदे गटात प्रवेश करत आहात का?, असे लटके यांना विचारण्यात आले. यावर ऋतुजा लटके यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पाहत मी बोलू का असं विचारलं. त्यावर महाडेश्वरांनी ‘मी बोलणार नाही’, असं सांगण्याचा सल्ला लटके यांना दिला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.