मुंबई : जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार आज सकाळी घसरणीसह उघडले. गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३ अंकांनी घसरला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६ अंकांच्या घसरणीसह १७,०८७ अंकांवर उघडला. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अमेरिकी बाजारात घसरण पाहायला मिळाली. याशिवाय देशातील सप्टेंबर महिन्यातील महागाईचा दर पाच महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला, त्यामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. व्यापार सत्राच्या सुरुवातीला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी लाल चिन्हांत उघडले. ३० शेअर्सचा सेन्सेक्स ११३.१७ अंकांनी घसरून ५७,५१२.७४ अंकांवर उघडला. दुसरीकडे, ५० शेअर्सचा निफ्टीही सुरुवातीच्या व्यवहारात घसरला.

बोनस शेअर इश्यू करण्याच्या तारखेत झाला मोठा बदल; जाणून घ्या अपडेट्स
सेक्टरची स्थिती
आजच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो, फार्मा, मेटल, एफएमसीजी, एनर्जी शेअर्स वधारत आहेत, तर आयटी, बँकिंग, रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. स्मॉल कॅप निर्देशांकात वाढ होत असताना मिड कॅप निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहे. निफ्टीच्या ५० समभागांपैकी केवळ २० समभाग वाढीसह आणि ३० समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी केवळ १४ समभाग तेजीत उघडले आणि १६ समभागात घसरण नोंदवली.

मुहूर्त ट्रेडिंगची वेळ ठरली; दिवाळीच्या खास काळात काय करावे अन् काय करू नये…
अमेरिकी बाजारात घसरण
दुसरीकडे, अमेरिकेतील महागाईचे आकडे जाहीर झाल्यानंतर डाऊ जोन्स ३० अंकांनी घसरून बंद झाला. तसेच Nasdaq मध्ये ०.०९ टक्क्यांनी S&P ५०० मध्ये ०.३३ टक्के घट झाली आहे. SGX निफ्टी ४२ अंकांच्या किंचित घसरणीसह १७०६३ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. OPEC+ देशांनी मागणीचा अंदाज कमी केल्यानंतर कच्च्या तेलात २.२ टक्क्यांची घसरण झाली.

शेअर होल्डर्सची बल्ले-बल्ले; देशातील सर्वात मोठी IT कंपनी प्रति शेअर आठ रुपये लाभांश देणार
कोणत्या शेअर्समध्ये तेजी
आजच्या ट्रेडिंग सत्रात वाढीसह उघडलेल्या शेअर्समध्ये एचसीएल टेक ३.२५ टक्के, महिंद्रा १.२७ टक्के, सन फार्मा ०.९२ टक्के, डॉ. रेड्डी ०.८७ टक्के, मारुती सुझुकी ०.६७ टक्के, एनटीपीसी ०.६७ टक्के, अॅक्सिस बँक ०.३८ टक्के, पॉवर ग्रिड ०.३७ टक्के, आयटीसी ०.१२ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण
खराब निकालांमुळे विप्रो ५.११ टक्क्यांसह व्यवहार करत आहे. एचडीएफसी १.०२ टक्के, टीसीएस ०.७४ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.७१ टक्के, एचडीएफसी बँक ०.५६ टक्के, बजाज फायनान्स ०.४६ टक्के, लार्सन ०.३८ टक्के, एशियन पेंट्स ०.३८ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here