नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना यंदा माहागाईतून दिलासा मिळताना दिसत नाही. सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.४१ टक्क्यांवर पोहोचला असून ऑगस्टमध्ये तो ७ टक्के आणि जुलैमध्ये ६.७१ टक्के होता. एक वर्षापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये किरकोळ महागाई दर ४.३५ टक्के होता. दरम्यान, खाद्यपदार्थांच्या महागाईच्या दरातही वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात अन्नधान्य महागाई ८.६० टक्क्यांवर पोहोचली आहे, जी ऑगस्टमध्ये ७.६२ टक्के होती. सप्टेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ झाली आहे.

आनंदावर विरजण! जगभरात भारतीय अर्थव्यवस्थेचा डंका, मात्र घरात चिंतेचे वातावरण
किरकोळ महागाई दर किंवा चलनवाढ हा तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारा दर आहे. गेल्या काही वर्षात भारतात किरकोळ महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अन्नधान्य महागाई वाढली आहे. अन्नधान्य महागाई ८.६० टक्क्यांवर पोहोचली आहे, जी ऑगस्टमध्ये ७.६२ टक्के होती. भाज्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे ऑगस्ट २०२२ मध्ये १३.२३ टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भाज्यांचा महागाई दर १८.०५ टक्के झाला आहे.

महागाईने रडवले
सप्टेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात किरकोळ महागाईत मोठी वाढ झाली आहे. शहरी भागात किरकोळ महागाईचा दर ७.२७ टक्के राहिला, तर ग्रामीण भागात किरकोळ महागाईचा दर ७.५६ टक्के आहे, जो ऑगस्टमध्ये ७.१५ टक्के होता. शहरी भागात खाद्यपदार्थांची महागाई ऑगस्टमधील ७.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्क्यांवर आली आहे. तर, सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागातील महागाई ८.५३ टक्के आहे, जी ऑगस्टमध्ये ७.६० टक्के होती.

‘या’ ३ प्रभावी मार्गांनी महागाईवर मात करण्यात तुम्हाला मिळेल मोठी मदत
EMI महागणार!
देशातील किरकोळ महागाई पुन्हा ७ टक्क्यांच्या वर राहिला आहे, जो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) ६ टक्क्यांच्या मर्यादा पातळीपेक्षा जास्त आहे. महागाईमुळे आरबीआयने रेपो रेट ५ महिन्यात १.९० टक्क्यांनी वाढवला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना महाग EMI चा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत किरकोळ महागाई वाढल्यानंतर सर्वसामान्यांना महागड्या ईएमआयमधून दिलासा मिळणार की नाही असा प्रश्न आता उद्भवत आहे.

महागाईच्या आघाडीवर चांगली बातमी, ऑगस्टमध्ये घाऊक निर्देशांक १२.४१ टक्क्यांवर
चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम
गुंतवणूकदारांवर महागाईचा मोठा परिणाम होतो. यासोबतच कामगार, शिक्षक, बँक कर्मचारी अशा स्थिर उत्पन्न गटातील लोक इतर वर्गावर महागाईचा फटका बसतो. यासह एक फार मोठा वर्ग, शेतकरी वर्ग, ज्यांचे उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे, महागाईच्या वाढ आणि घसरणीमुळे त्यांच्यावर मोठा परिणाम होतो. चलनवाढ कर्जदारांनाही प्रभावित करत. यासोबतच एक मोठे क्षेत्र आयात-निर्यातीवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होतात.

महागाईमुळे सार्वजनिक कर्जही वाढते कारण जेव्हा किंमतीची पातळी वाढते तेव्हा सरकारला सार्वजनिक योजनांवरील खर्च वाढवावा लागतो आणि खर्च भागवण्यासाठी सरकार जनतेकडून पैसे आकारते. महागाईमुळे आपला खर्च भागवण्यासाठी सरकार नवीन कर लादते, त्यामुळे जुन्या करांमध्येही वाढ होऊ शकते. साहजिकच त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here