Weather Forecast : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र, मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसाने झालं आहे.

हायलाइट्स:
- राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे
- काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे
- कोकण, पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भला यलो अलर्ट
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळे बोर्डी गावाला नदीचं स्वरुप आलं आहे. अकोट तालुक्यातील बोर्डी परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. १९६५ नंतर आलेल्या सर्वात मोठ्या पुराचा मोठा फटका बोर्डी गावाला बसला आहे. या गावात पावसाने अनेक घरात पाणी घुसलं आहे. अनेक घरांच्या भिंती देखील पडल्या आहेत. या पावासामुळे गावाशेजारुन वाहणाऱ्या घोगा आणि लेंडी नाल्याचं पाणी गावात घुसलं होतं. या गावात या पुरामुळे अनेक संसार उघड्यावर पडलेत. धान्य, शेतमाल, संसारोपयोगी वस्तू अक्षर: मातीमोल झाल्या आहेत.
लातूरमध्ये पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. रात्रभर घरात घुसलेले गटारीचे पाणी उपसण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. घराला गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुलांचे दप्तर भिजले, स्वयंपाक घरातील अन्नधान्य, सामान सगळचं पाण्याखाली गेल्याचं नागरिक म्हणाले. पालिकेला गाऱ्हाणं मांडून वैतागले असल्याचं नागरिकांनी म्हटलं. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे गटारी तुंबण्याचं प्रमाण कमी होत नसल्याचं नागरिकांच म्हणण आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लातूर शहरात झालेल्या पावसाने काही शहरातील काही भागाला मोठा तडाका दिला. कित्येक दिवसांपासून तुंबलेल्या गटारी सायंकाळी या पडलेल्या पावसामुळे तुडुंब भरून रस्त्यावर वाहू लागल्य. तर काही घरांमध्येही शिरल्या. बाभाळगाव रोडवर असणाऱ्या म्हाडा कॉलनीत त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.