Authored by महेश गायकवाड | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Oct 2022, 12:08 pm
Thane News : एसीबीच्या ट्रॅपमधून तलाठी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील शहापूर तालुक्यातील घुटघर येथे घडला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हायलाइट्स:
- एसीबीच्या ट्रॅपमधून तलाठी पसार
- कर्मचाऱ्यांना दिला दुचाकीचा धक्का
- दोन कर्मचारी किरकोळ जखमी
सोसायटीच्या जागेचा सातबारा नावावर करण्यासाठी शहापूर तालुक्यातील घुटघर येथील तलाठी रुपेश मेरत यांनी तक्रारदाराकडे १३ हजारांची लाच मागितली होती. यापूर्वी त्याने ५ हजार रुपये घेतले होते. शहापूरमधील कळंबा रोड परिसरात बुधवारी सायंकाळी ३ हजार रुपये घेतल्यानंतर मेरत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सात जणांच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात येत होते.
मात्र, मेरत यांनी एसीबीच्या कर्मचाऱ्यांना दुचाकीचा धक्का मारुन पलायन केले. यामध्ये एसीबीचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून ज्यावेळी हा प्रकार घडला त्या ठिकाणी गर्दी होती. अशी माहिती एसीबीच्या एका अधिकाऱ्यांने दिली. एसीबीकडून मेरत यांचा शोध घेण्यात येत आहे.
अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे; किरीट सोमय्यांकडून नवी अपडेट
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Hi esy.es Administrator, very same right here: Link Text