परिसराला लागून असलेल्या टेंबलाईवाडी नाका झोपडपट्टीत जुगार अड्डा चालतो, अशी माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. शोभा हेगडे ही महिला हा अड्डा चालवते आणि तेथे महिला जुगार खेळतात, अशी माहिती खबऱ्याने दिली. पण पोलिसांना ते पटले नाही. कारण अनेक महिला मटका घेतात, गावठी हातभट्टीच्या दारू अड्डे चालवतात, पण कोल्हापुरात जुगार अड्डा महिला चालवतात, हीच माहिती पोलिसांना नवीन वाटली. त्यांनी दुपारी त्या अड्ड्यावर छापा टाकला. तेव्हा चक्क मालकिणीसह पाच महिला व दोन पुरूष जुगार खेळत बसले होते. या सर्वांना अटक केली.
वाचा:
कोल्हापुरात मटका, जुगार पूर्णपणे बंद आहे, असा पोलिसांचा दावा आहे. पण अनेक ठिकाणी तो राजरोसपणे सुरू आहे. च्या काळात तर त्याला आणखी ऊत आला आहे. दुपारच्या वेळी तर चक्क महिलाच जुगार खेळत आहेत. कोल्हापुरातील या कारवाईने पोलीसही चक्रावले आहेत. या प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. अशा पद्धतीने आणखी कुठे जुगार अड्डा सुरू असेल तर माहिती द्यावी, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.
वाचा:
या कारवाईत शोभा संजय हेगडे, निलम विजय कांबळे, वर्षा इकबाल लोंढे, भिंगरी अविनाश सकट, सुरेखा राजू नरंदेकर, सुनील संभाजी जाधव, करीम मोहिद्दीन खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा हजार रूपये रोख,दोन मोबाइल आणि जुगार खेळण्याचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times