एचसीएल टेक हा लाभांश राजा असलेल्या समभागांपैकी एक असून आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस लाभांश देण्याचा त्यांचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे. तिसरा अंतरिम लाभांश विचारात करता एचसीएल टेक्नॉलॉजीने आता आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आतापर्यंत प्रति शेअर ३८ रुपयाचा एकूण लाभांश जाहीर केला आहे. सध्या, एचसीएल टेकचे लाभांश उत्पन्न सुमारे ४% आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यापूर्वी त्यांनी १९ रुपये आणि १० रुपये लाभांश दिला होता. चालू आर्थिक वर्षात एचसीएल टेकने एप्रिलमध्ये रु. १८ प्रति शेअरचा पहिला अंतरिम लाभांश दिला, तर या वर्षी एप्रिलमध्ये प्रति शेअर रु. १० चा दुसरा अंतरिम लाभांश दिला आहे. या दोन लाभांशांची एकूण टक्केवारी १४००% किंवा रु. २८ प्रति शेअर आहे.
आयटी कंपनीचा तिमाही निकाल
एचसीएल टेक्नॉलॉजीजचा निव्वळ नफा सप्टेंबरच्या तिमाहीत ७ टक्क्यांनी वाढून ३,४८९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीने ३,२५९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. या कालावधीत कंपनीचे उत्पन्नही १९.५ टक्क्यांनी वाढून २४,६८६ कोटी रुपये झाले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति इक्विटी शेअर रु.१० चा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. तसेच मागील आर्थिक वर्ष FY22 मध्ये कंपनीने प्रति शेअर तब्बल २,१००% ते रु. ४२ इतका इक्विटी लाभांश दिला. लाभांश एकूण रु. ११,३९२ कोटी इतका झाला.
टीसीएसचे तिमाही निकाल
यापूर्वी मंगळवारी देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीची कामगिरी अंदाजापेक्षा चांगली झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा ८.४ टक्क्यांनी वाढून १०,४३१ कोटी रुपये झाला आहे. मार्केट कॅपनुसार TCS ही रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. याशिवाय कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ८ रुपये प्रति शेअरचा दुसरा अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे.