Uddhav Thackeray Woo Muslim community | हा व्हिडिओ मुंबईच्या भायखळा परिसरातील आहे. काही दिवसांपूर्वी ईद ए मिलादच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांनी या परिसरात एक मिरवणूक काढली होती. त्यावेळी या मिरवणुकीत चक्क ‘शिवसेना-शिवसेना’ हे गाणे वाजताना दिसत होते. एवढेच नव्हे तर ईद ए मिलादच्या शोभायात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या ताजियावर भगव्या रंगातील महाराष्ट्राची प्रतिमा दिसत होती.

हायलाइट्स:
- मुस्लीम बांधव उद्धव ठाकरेंसोबत
- शिवसेनेच्या मतदारांचा परीघ विस्तारतोय का?
हा व्हिडिओ मुंबईच्या भायखळा परिसरातील आहे. काही दिवसांपूर्वी ईद ए मिलादच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांनी या परिसरात एक मिरवणूक काढली होती. त्यावेळी या मिरवणुकीत चक्क ‘शिवसेना-शिवसेना’ हे गाणे वाजताना दिसत होते. एवढेच नव्हे तर ईद ए मिलादच्या शोभायात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या ताजियावर भगव्या रंगातील महाराष्ट्राची प्रतिमा दिसत होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानिमित्ताने किमान मुंबईतील मुस्लीम मतदारांच्या मनातील शिवसेनेबाबतची प्रतिमा बदलत आहे का, याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. भायखळ्यासारख्या मुस्लीम बहुल परिसरातील हे चित्र पाहिल्यानंतर आगामी काळात मुंबईतील मुस्लीम मतदार भविष्यात शिवसेनेच्या पाठिशी उभा राहू शकतो का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातील भाषण इतकं महत्त्वाचं का?
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात कुठेतही मुस्लीम समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची समीकरणे कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. उद्धव यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्याचा उल्लेख केला. याशिवाय, काश्मीरमध्ये औरंगजेब हा भारतीय लष्करातील जवान देशासाठी शहीद झाल्याचे सांगितले. २०१८ मध्ये दहशतवाद्यांनी औरंगजेबची हत्या केली होती. उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबच्या हौतात्म्याचा मुद्दा उपस्थित करत तो आपल्यासाठी भावाप्रमाणे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेश होण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दसरा मेळाव्याला अनेक मुस्लीम शिवसैनिकांनीही उपस्थिती लावली होती. या सगळ्याचीही चांगलीच चर्चा रंगत आहे.
तुर्तास उद्धव ठाकरे यांचे लक्ष्य अंधेरी पूर्व पोटनिवडणूक असली तरी भविष्यात ठाकरे गट हा पॅटर्न राज्यभरात वापरुन मुस्लीम मतदारांना आकर्षित करु शकतो. अंधेरीची पोटनिवडणूक जिंकण्यासासाठी शिवसेनेची संपूर्ण मदार ही मुस्लीम आणि मराठी व्होटबँकेवर आहे. भाजपकडून गेल्या काळात सातत्याने आक्रमक हिंदुत्त्वाची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे तुलनेत सर्वांना सामावून घेण्याची भूमिका असलेल्या शिवसेनेच्या पारड्यात मुस्लीम मतदार दान टाकू शकतात. या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने उमेदवार न उतरवल्यास मुस्लीम व्होटबँक आपल्या बाजूला वळवणे सेनेला सोपे जाईल, असे सांगितले जाते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.