गुजरातच्या मेहसाणा येथील कडीमध्ये वडवाला मंदिराचे महंत कनिराम बापू यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान एक विचित्र घटना घडली. कनिराम बापू हत्तीवर बसलेले असताना हत्तीवरील छत्रीचा स्पर्श विजेच्या तारेला झाला. यामुळे हत्तीला आणि अंबातीवरील सगळ्यांनाच शॉक बसला. शॉक लागताच हत्ती पळू लागला.

दुर्घटनेत कनिराम बापूंना कोणतीही दुखापत झाली नाही. मला काहीही झालं नाही. ही देवाचीच कृपा आहे. मी पूर्णपणे बरा आहे. विजेचा धक्का बसल्यानं हत्ती अचानक बेभान झाला. त्यामुळे तो पळू लागला आणि आम्ही वरून खाली पडलो. मी तरुणांच्या अंगावर कोसळलो. त्यामुळे कोणतीही इजा झाली नाही. मी सुखरुप आहे, असं कनिराम बापूंनी सांगितलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.