Authored by रमेश खोकराळे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Oct 2022, 1:44 pm
Maharashtra Politics | ऋतुजा लटके या ज्या पदावर आहेत, त्या पदावरील कर्मचाऱ्याचा राजीनामा सहआयुक्त मंजूर करू शकतात. मात्र, हे प्रकरण पालिका आयुक्तांपर्यंत नेण्यात आले असून लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. लटके यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेल्या आहेत. तरीदेखील पालिका आयुक्तांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

हायलाइट्स:
- पक्षाच्या आदेशाने ऋतुजा लटके निवडणूक लढवत आहेत
- त्यांनी २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर अशा दोन वेळेला राजीनामा दिला होता
तत्पूर्वी न्यायालयात ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी जोरदार युक्तिवाद केला. रमेश लटके यांच्या निधनानंतर पक्षाच्या आदेशाने ऋतुजा लटके निवडणूक लढवत आहेत. त्यांनी २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर अशा दोन वेळेला राजीनामा दिला होता. मात्र, आता अनेक दिवस उलटूनही पालिकेने त्यावर अभिप्राय दिलेला नाही. ऋतुजा लटके यांच्याकडे पालिकेची कोणतीही थकबाकी शिल्लक नाही. तसेच नोटीस पिरीयडमधील ६७ हजार रुपयांचा पगारही लटके यांनी पालिकेकडे जमा केला आहे. ऋतुजा लटके या ज्या पदावर आहेत, त्या पदावरील कर्मचाऱ्याचा राजीनामा सहआयुक्त मंजूर करू शकतात. मात्र, हे प्रकरण पालिका आयुक्तांपर्यंत नेण्यात आले असून लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. लटके यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेल्या आहेत. तरीदेखील पालिका आयुक्तांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा यु्क्तिवाद अॅडव्होकेट विश्वजित सावंत यांच्याकडून करण्यात आला.
यावेळी ऋतुला लटके यांच्या वकिलांकडून २०१२ सालच्या एका प्रकरणाचाही दाखला देण्यात आला. हेमांगी वरळीकर यांनीही २०१२ साली निवडणूक लढवण्यासाठी अशाचप्रकारे नोकरी सोडली होती. हेमांगी वरळीकर या पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांचा राजीनामा एका महिन्याच्या आत मंजूर करण्यात आला होता. मग ऋतुजा लटके यांचा राजीनामा का स्वीकारला जात नाही, असा सवाल वकिलांकडून विचारण्यात आला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.