Authored by अमोल सराफ | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Oct 2022, 1:49 pm
Accident News : जनावर आडवे आल्याने त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील कार पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या भीषण अपघातात एक सहा वर्षीय बालक व वृध्द महिला जागीच ठार झाली असून गाडीचा चक्काचूर झाला आहे.

हायलाइट्स:
- कार पुलाच्या कठड्यावर आदळल्याने भीषण अपघात
- अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू
- बुळडाणा येथील गणेशपूर-मोहाडी रस्त्यावरील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील गणेशपूर-मोहाडी रस्त्यावर पहाटे घडली. जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील अवचार कुटुंबिय काही कामानिमित्त पहाटे चिखलीकडे कारने जात होते. दरम्यान, मोहाडी-गणेशपूर रस्त्यावर त्यांच्या वाहनाच्या समोर जनावर आडवे आल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली.
या भीषण अपघातात नंदा विठ्ठल अवचार (वय ६०), ऋषभ अंगत अवचार (वय ६) हे जागीच ठार झालेत. तर अंगत विठ्ठल अवचार (वय ३५), माधुरी अंगत अवचार (वय ३०), परी अंगत अवचार (वय २) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी पती-पत्नी असलेल्या अवचार दाम्पंत्याला खामगांव खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर दोन वर्षीय चिमुकलीवर खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुर आहेत. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
४८ तासांनंतर ताटातूट झालेल्या बिबट्याच्या बछड्याची आणि आईची भेट
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.