मुंबई : हिंदाल्को, वेदांत आणि नाल्कोचे शेअर्स आज सुरुवातीच्या व्यवहारात १.५ ते ३ टक्क्यांनी वधारले आहेत. युक्रेनवर रशियाने पुन्हा हल्ले तीव्र केल्यानंतर अमेरिका रशियन अ‍ॅल्युमिनियमवर निर्बंध लादण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामुळे आज लंडन मेटल एक्सचेंज (LME) वर अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे.

आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)वर नॅल्को (NALCO) चे शेअर्स ३.२८ टक्क्यांच्या वाढीसह ७२.८० च्या पातळीवर आले. त्याच वेळी, हिंदाल्कोने (Hindalco) ३.५ टक्क्यांनी वाढून ४१४.७० ची पातळी गाठली. तसेच वेदांतचे शेअर्सही १.२ टक्क्यांच्या वाढीसह २९०.९५ रुपयांवर व्यवहार करीत होते.

रशिया यूक्रेनवर अणवस्त्र हल्ला करण्याची शक्यता, अमेरिकेनंही दंड थोपटले, बायडन आक्रमक
जागतिक बाजारातील परिणाम
या बातमीमुळे लंडन मेटल एक्सचेंजवर अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीत इंट्राडेमध्ये ७.३ टक्क्यांनी वाढ झाली. जी आतापर्यंतची सर्वात मोठी इंट्राडे तेजी आहे. बुधवारी, एलएमईवरील अ‍ॅल्युमिनिअमची किंमत ३.१ टक्क्यांनी वाढून २,३०५ डॉलर प्रति मेट्रिक टन वर स्थिरावली. अमेरिकेतील सर्वात मोठी अ‍ॅल्युमिनियम उत्पादक कंपनी अल्कोआचे शेअर्सने ८.६ टक्क्यांपर्यंत उसळी घेतल्यानंतर दिवसाअखेर ५.३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

IT कंपनी लवकरच देणार लाभांश, गुंतवणूकदार होणार मालामाल; रेकॉर्ड डेट काय, चेक करा डिटेल्स
तज्ज्ञांचे मत
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये तणाव वाढल्याने रशिया अमेरिका, रशियावर कडक कारवाई करण्यासाठी तीन पर्याय शोधत आहे. यातील पहिली संपूर्ण बंदी आहे. दुसऱ्या पर्यायांतर्गत रशियातून निर्यात होणाऱ्या अ‍ॅल्युमिनियमवर इतका जास्त कर लावावा की तो बंदी म्हणून काम करेल आणि तिसऱ्या पर्यायांतर्गत रशियामध्ये अ‍ॅल्युमिनियमचे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर बंदी घालता येईल.

भारताचा पुतीन यांना झटका, तिसऱ्यांदा विरोधात मतदान, संयुक्त राष्ट्रात रशिया एकाकी
भारतावर काय परिणाम
अमेरिकने कारवाई केल्यास ते भारताच्या हिताचे असेल. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अ‍ॅल्युमिनियमला मोठी मागणी आहे. याचा फायदा भारतीय कंपन्यांना मिळणार आहे. हे लक्षात घेऊन जिओजित फायनान्शिअल हिंदाल्को आणि वेदांतावर दीर्घ मुदतीसाठी सकारात्मक आहे. हे दोन्ही शेअर्स सध्याच्या पातळीवरून १५ टक्क्यांनी वाढू शकतात. तसेच सध्या रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजीमुळे देशांतर्गत बाजारपेठेतही अ‍ॅल्युमिनियमची मागणी वाढेल, ज्याचा फायदा या कंपन्यांना होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here