१९९ च्या या यादीतील सर्वात तरुण व्यक्ती म्हणजे थायलंडमधील माथेरिन नोवरातपोंग ही ९ वर्षांची मुलगी. तिला मेंदूचा कर्करोग झाला आहे. तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. मॅथरिनवर अनेकदा मेंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. पण त्याने ती बरी झाली नाही आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी अल्कोर फाउंडेशनशी संपर्क साधला. या यादीत बिटकॉइन तज्ज्ञ हॅल फिनीचाही समावेश आहे. २०१४ मध्ये एएलएसमुळे त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्याचा मृतदेह लिक्विड नायट्रोजन टाकीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या प्रक्रियेला क्रायोप्रिझर्वेशन (Cryopreservation) म्हणतात.
क्रायोप्रिझर्वेशनची प्रक्रिया कधी सुरू होते?
क्रायोप्रिझर्वेशनची प्रक्रिया कायदेशीररित्या मृत घोषित केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या परवानगीने किंवा मृत्यूपूर्वी केली जाते. जेव्हा व्यक्ती अधिकृतपणे आणि कायदेशीररित्या मृत घोषित केली जाते तेव्हा क्रायोप्रिझर्वेशनची प्रक्रिया सुरू होते. यानंतर, मानवी शरीरातून रक्त आणि इतर द्रव काढून टाकले जातात. ते विशेष रसायनांनी भरलेले असतात जेणेकरून बर्फाचे स्फटिक शरीरात तयार होत नाहीत. यानंतर शरीराला एका विशिष्ट थंड तापमानात द्रव नायट्रोजनच्या टाकीमध्ये ठेवले जाते. अल्कोर फाऊंडेशनमध्ये असलेल्या लोकांचे मृतदेह स्कॉट्सडेल, ऍरिझोना इथे ठेवण्यात आले आहे.
शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी मोजावी लागेल भली मोठी किंमत…
मॅक्स मोरे यांनी सांगितलं की, अल्कोर फाऊंडेशनचे सध्या १४०० जिवंत सदस्य आहेत. ज्यांनी भविष्यात आपले शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी पैसे दिले आहेत. हे पैसे तुम्ही आयुष्यभर विमा कंपनीला द्याल तेवढेच आहे. तसे, मृतदेह टाकीत ठेवण्यासाठी किमान २ लाख डॉलर्स म्हणजेच १.६४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागते. जर तुम्हाला तुमचे शरीर सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्हाला ८० हजार डॉलर्स म्हणजेच ६५.८६ लाख रुपये द्यावे लागतील.