पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या १९ वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाची प्रीत यादव या तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. याचा गैरफायदा घेत त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून या १९ वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दत्तवाडी परिसरातील अनंत कुमार सोसायटीमध्ये शंतनू वाडकर हा तरुण राहत होता. शंतनू याची इन्स्टाग्रामवर प्रीत यादव असे आयडी असलेल्या तरुणीशी ओळख झाली. तर त्याच दरम्यान प्रीत यादव हिने शंतनूला अर्धनग्न फोटो मागितल्यावर त्याने तिला शेअर केले. त्यानंतर मला पैसे दे, अन्यथा तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करेल, अशी धमकी प्रीत यादव हिने दिली. त्यावर त्याने ४ हजार ५०० रुपये ऑनलाईन दिले. त्यानंतर देखील सतत पैसे मागू लागल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून शंतनूने २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या असलेल्या इमारतीवरुन उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मात्र, या प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनूच्या सर्व विधी प्रक्रिया आटोपल्यानंतर गुन्हा गुन्हा दाखल करणार होतो अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. म्हणून या प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला.
४८ तासांनंतर ताटातूट झालेल्या बिबट्याच्या बछड्याची आणि आईची भेट