हैदराबादः तेलंगणमधील पेड्डापल्ली जिल्ह्यात एका व्यक्तीचा करोना व्हायरसने मृत्यू झाला. अनेक तास या व्यक्तीचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये पडून होता. नगरपालिकेचे चालक हॉस्पिटलमधून मृतदेह स्मशानात नेण्यासाठी टाळाटाळ करत होते.

ट्रॅक्टर चालवत डॉक्टरने मृतदेह नेला

यादरम्यान हॉस्पिटलमधील एका डॉक्टरांनी चर्चा केली. यानंतर डॉक्टरांनी स्वतः ट्रॅक्टरवर मृतदेह ठेवला. ट्रॅक्टर चालवून डॉक्टरांनी मृतदेह स्मशानापर्यंत नेला.

डॉ. श्रीराम हे पेड्डापल्ली जिल्ह्याचे नोडल ऑफिसर आहेत. नगरपालिकेच्या चालकांना मृतदेह स्मशानापर्यंत नकार दिल्यावर त्यांनी स्वतः पीपीई किट घातलं आणि ट्रॅक्टर चालवत हा मृतदेह नेला. यानंतर मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार केले गेले.

४५ वर्षाच्या व्यक्तीचा रविवारी झाला मृत्यू

पेड्डापल्लीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाने नगरपालिकेला मृतदेह स्मशानापर्यंत नेण्याच्या सूचना दिल्या. पण तिथून कुणीच आलं नाही. यामुळे मृतदेह कित्येक तास हॉस्पिटलमध्येच पडून होता.

आपण या जिल्ह्याचे मेडिकल ऑफिसर आहोत. यामुळे मृतदेहावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार व्हावेत, ही जबाबदारी आपली आहे. करोनाविरोधी लढाईत प्रशसानाने सक्रिय राहून आपली जबाबदारी आणि त्याचे पालन करावे, यासाठी आपण ट्रॅक्टर चालवलं. यातून चालकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असं डॉ. श्रीराम म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here