पती पत्नीनं स्वत:च्या शरीरावर पेट्रोल ओतून घेतलं. त्यांच्या हातात काडेपेटी होती. त्यांनी काडेपेटीतून माचिस काढली. त्यांच्या आसपास पोलीस आणि शेजारीपाजारी होते. पोलीस जवळ येऊ लागताच पतीनं काडेपेटी पत्नीकडे दिली. तिनं लगेच माचिस पेटवली.

बंगळुरू महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या केआर पुरममध्ये बुलडोझर तोडक कारवाई करत होता. हा बुलडोझर सोना सेन आणि त्यांचे पती सुनील सिंह यांच्या घराजवळ पोहोचला. त्यांनी आरडाओरडा केला. आम्ही स्वत:ला पेटवून घेऊ अशी धमकी दिली. घराबाहेर असलेल्या संरक्षक भिंतीसमोर दोघे उभे राहिले. त्यांच्या हातात पेट्रोलची एक बाटली होती. त्यांनी कारवाईचा निषेध करत स्वत:वर पेट्रोल टाकून घेतलं. पोलीस आणि शेजाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पोलिसांनी सुनील यांचा हात धरताच त्यांनी काडेपेटी सोना यांच्या हातात दिली. पुढच्या काही क्षणांत त्यांनी माचिस पेटवली. त्या स्वत:ला पेटवून घेणार असं वाटत असताना शेजाऱ्यांनी त्यांच्या अंगावर बादलीनं पाणी ओतलं. आमचं घर अवैध नाही. आमच्याकडे घराची कागदपत्रं असल्याचा दावा दोघांनी केला. शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.